कामकाजात अडथळा आणण्यासाठी नियम २६७ चा शस्त्र म्हणून वापर

29 Nov 2024 21:41:36
- जगदीप धनकड यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली, 
राज्यसभेत सातत्याने होत असलेल्या गोंधळाचा निषेध करीत नियम २६७ चा वापर विरोधी पक्षांचे सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्यासाठी करीत असल्याचा गंभीर आरोप राज्यसभेचे अध्यक्ष Jagdeep Dhankad जगदीप धनकड यांनी आज केला.
 
 
Jagdeep Dhankad
 
नियम २६७ नुसार दिलेल्या स्थगनप्रस्तावाच्या सूचना धनकड यांनी फेटाळल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली. विरोधकांच्या या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त करताना Jagdeep Dhankad धनकड म्हणाले की, सदस्य एकच एक मुद्दे उपस्थित करण्याचा वारंवार प्रयत्न करीत यामुळे सभागृहाच्या कामकाजाचे पहिले तीन दिवस वाया गेले. या दिवसांचा उपयोग आम्ही सार्वजनिक हितासाठी करायला हवा होता. सदस्य म्हणून आमचे जे कर्तव्य आहे, त्याचे पालन करायला हवे होते.
 
 
प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज न होणे, हा जनतेसाठी मोठा धक्का आहे, असे नमुद करीत Jagdeep Dhankad धनकड म्हणाले की, नियम २६७ चा वापर सभागृहाच्या अडथळा निर्माण करणे तसेच एक शस्त्र म्हणून त्याचा वापर करणे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही आपल्या वर्तणुकीतून अतिशय वाईट उदाहरण सादर करीत आहे, हा देशातील लोकांचा अपमान आहे. आम्ही त्यांच्या अपेक्षांवर उतरत नाही. आमचे काम लोककेंद्रीत नाही तर, अप्रासंगिक होत चाले आहे. लोक आमची टिंगलटवाळी करीत आहेत, आम्ही लोकांच्या साधन बनलो आहे.
Powered By Sangraha 9.0