मेक्सिकोची महिला भारताबद्दल अशी काही बोलली

29 Nov 2024 14:10:45
Mexican Woman एका मेक्सिकन महिलेच्या भारताबद्दलच्या मताने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या महिलेचा दावा आहे की, तिला देशात कोणतेही कपडे घालणे पूर्णपणे आरामदायक वाटते. मात्र, नेटकऱ्यांना तिचे म्हणणे पटले नाही. विविधता, लोकशाही आणि सांस्कृतिक वारसा यामुळे, भारत जगभर प्रसिद्ध आहे. येथील बहुसांस्कृतिकतेने केवळ भारतीयच नाही तर परदेशी लोकांनाही आकर्षित केले आहे. मेक्सिकोची जॅकलीन मोरालेस क्रूझ देखील भारतीय संस्कृतीवर प्रेम करणाऱ्यांपैकी एक आहे.ती आता नागपूर, महाराष्ट्र येथे राहते. ती रोज आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिने एका व्हिडिओमध्ये सांगितले की, तिला भारतात किती सुरक्षित वाटते.
 
 
nagpur
 
 
जॅकलीनने भारताबद्दल Mexican Woman जे काही बोलले ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे सर्व परदेशी व्यक्तीच्या तोंडून ऐकणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जॅकलीनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करून लिहिले की, 'भारताला माझे घर म्हणताना खूप आनंद होत आहे.' तिने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, भारतात महिलांच्या सुरक्षेबाबत विदेशी लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत.ती म्हणते की,तिला भारतात फक्त चांगला अनुभव आला नाही, तर इथली संस्कृती, लोक आणि वातावरण यामुळे तिला सुरक्षित वाटतं.
मी भारताला माझे घर मानते
व्हिडिओमध्ये Mexican Woman जॅकलीन तिला भारतात खूप सुरक्षित वाटते असे म्हणताना ऐकू येते. भारतीय असो वा पाश्चात्य कपडे, त्यांना या देशात काहीही घालण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, तिची या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही लोकांनी तिच्या शब्दांचे समर्थन केले, तर काही लोकांनी महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांचा हवाला देत निषेधही केला.
एका युजरने Mexican Woman कमेंट केली की, तुम्ही परदेशी लोकांसाठी नक्कीच प्रेरणास्थान आहात. दुसऱ्या युजरने लिहिले की, कोणीतरी भारताबद्दल सकारात्मक बोलत आहे हे पाहणे खूप आनंददायक आहे. अन्यथा काही लोक भारताची बदनामी करण्यासाठी नकारात्मक कथा तयार करतात. आणखी एक युजर म्हणाला, मी या बहिणीला ओळखत नाही पण एक भारतीय महिला असल्याने मला सुरक्षित वाटत नाही. मी रात्री एकटी बाहेर जाऊ शकत नाही. आणखी एका युजरने कमेंट केली की,परंतु महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांचे काय ? अशा ही प्रतिक्रिया मिळाल्या.
Powered By Sangraha 9.0