ओएचई केबल तुटल्याने रेल्वेगाड्यांची वाहतूक विस्कळीत

29 Nov 2024 21:51:19
- दोन्ही दिशांच्या गाड्यांवर परिणाम
- प्रवाशांना मोठा मनस्ताप
 
नागपूर,
नागपूर-हावडा मुख्य मार्गावरील कामठी लगत टिळक शालिमार एक्स्प्रेस गाडीचा पँटो ओएचई केबलमध्ये अडकल्याने तो तुटला. त्यामुळे हावडा मुख्य मार्गावरील विद्युत लाईन बंद झाल्याने Rail traffic disrupted वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका रेल्वे वाहतूकीला बसला असून दोन तास पर्यंत या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शुक्रवारी दुपारी कामठी जवळ एक्स्प्रेस गाडीचा पँटो केबलमध्ये अडकल्याने तुटल्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बाधित डाऊन लाईन सायंकाळपर्यंत दुरुस्त होऊ शकली नाही. अशा स्थितीत हावडा लाईन गाड्यांतील प्रवाशांना दिवसभर अडचणींचा सामना करावा लागला.
 
 
rail dkl
 
रेल्वे गाड्यांना विलंब
Rail traffic disrupted : रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक शालिमार एक्स्प्रेसचा पँटो कामठी येथील रामनगर रेल्वे चौकीजवळ ५६४ लेव्हल क्रॉसिंगवर ओएचईमध्ये अडकला. हा ओएचई तुटला. त्यानंतर लगेच या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. यामध्ये कामठीकडे जाणार्‍या गाडी क्रमांक १२१५१ समरस्ता एक्स्प्रेस, १२२२२ हावडा-पुणे दुरंतो एक्स्प्रेस, १२८४४ अहमदाबाद पुरी एक्स्प्रेस थांबवण्यात आल्या. या गाड्या २ तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय गाडी क्रमांक २०२८५ बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस, १२४०९ रायगड-हजरत निजामुद्दीन गोंडवाना ०८२८२ बिलासपूर स्पेशल, ०८७१४ बालाघाट मेमूलाही बसला. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पथकाने घटनास्थळ गाठून ओएचई दुरुस्तीचे काम केले. मात्र, केबल खराब झाल्याने त्याची दुरुस्ती होऊ शकली नाही. अशा स्थितीत दोन्ही दिशांच्या गाड्यांवर परिणाम होत असल्याने कसाबसा अप मार्ग सुरू करण्यात आला. येथूनच दोन्ही दिशांची बाहेर काढण्यात आली. अशा परिस्थितीत प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. नागपूर रेल्वे स्थानकावर गाड्याही बराच वेळ थांबल्या होत्या. मुंबईहून हावड्याकडे जाणारी एक्स्प्रेस अर्ध्या तासाहून अधिक काळ नागपूर स्थानकावर थांबल्याची माहिती आहे.
Powered By Sangraha 9.0