प्लास्टिकच्या कचर्‍यांमुळे सौंदर्यांला बसली खिळ

29 Nov 2024 20:56:35
- सक्करदरा तलावात गाळ विखुरलेल्या अवस्थेत
- कोट्यावधी रुपये खर्चुनही तलाव प्रदूषित

नागपूर,
Sakkardara Lake : सक्करदरा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासन कोटी रुपये खर्च केले. या भोसलेकालीन ऐतिहासिक तलावाच्या सौंदर्यीकरणानंतर तलावाचे स्वरुप बदलण्यात यश मिळाले. परंतू निर्माल्य तलावाच्या बाजूने कायम असल्याचे दिसून येते. तलावातील जल प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने लोखंडी कुंपण तरी सुध्दा काही हौसी नागरिक मासे पकडण्यासाठी जाळी टाकून बसलेले असतात. दिवाळीनंतर तलावात कमळांची संख्या सर्वाधिक असते. परंतू यंदा निर्माल्य व गाळ विखुरलेल्या अवस्थेत असल्याने तलावाच्या सौंदर्यांला खिळ बसली आहे. तलावात प्लास्टिक व काचेच्या बाटल्या, डिस्पोजल ग्लास, थर्माकोलच्या शिट पडलेल्या असून, पाणी प्रदूषित करीत कमळाच्या फुलांना हानीकारक ठरत आहे.
 
 
sakkardara-talav
 
भिंत तुटलेल्या अवस्थेत
Sakkardara Lake : दक्षिण नागपुरातील या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाने १० कोटी रुपये खर्च केले. तलावाच्या सभोवताल असलेली सुरक्षा भिंत उत्तर भागात तुटलेल्या अवस्थेत असल्याने केरकचरा तलावात टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. तलावात केरकचरा व गाळ जमा झाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तलावातील गाळ स्वच्छ होत नसल्याने अस्वच्छ पाण्यामुळे कमळांची कमी झाली आहे. प्रदूषित पाण्यामुळे तलावातील कमळाची फुले कोमेजली आहे.
 
 
तलावाशेजारी निर्माल्य कायम
Sakkardara Lake : मुख्यत: तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घेतल्यानंतर तलावाचे स्वरुप बदलण्यात यश मिळाले. परंतू निर्माल्य तलावाच्या बाजूने कायम असल्याने केरकचरा वाढला आहे. यापूर्वी तलावात गणपती विसर्जन केले जात होते. महापालिकेने तलावात गणपती विसर्जन करण्यास बंदी घातल्याने गणपती विसर्जन बंद तरी निर्माल्य तलावाशेजारी दिसून येते. तलावाच्या पश्चिमेकडील भागात मोठे लोखंडी कुंपण घातले. तरी सुध्दा रस्त्यांच्या बाजूने निर्माल्य विखुरलेल्या अवस्थेत दिसून येते. निर्माल्य टाकण्यावर बर्‍यापैकी अंकुश लावण्याचा प्रयत्न मनपाने केला आहे. आता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0