- सुधीर मुनगंटीवार यांचा प्रशासनाला निर्देश
मुंबई,
चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी कापणीच्या आधी पिकांवर पडलेल्या लष्करी अळी आणि तुडतुडा यासारख्या रोगांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्याचा निर्देश आमदार Sudhir Mungantiwar सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. यासंदर्भात चंद्रपूर तसेच विविध विभागांच्या अधिकार्यांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्देश दिला. धान खरेदी केंद्रांवर नोंदणी बंद ठेवून शेतकर्यांना नाडणार्या संस्थावर व व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांमधे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. निवडणूक आचारसंहितेपूर्वीच पीक नुकसानीची भरपाई वितरित करण्याचा निर्देश कृषिमंत्र्यांसोबत झालेल्या तत्कालीन कृषिमंत्र्यांनी तेव्हा दिले होते. त्यासंदर्भात शेतकर्यांच्या तक्रारींचा आढावाही शुक्रवारी मुनगंटीवार यांनी घेतला. दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांच्या अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत पीक नुकसान भरपाईच्या विविध बिंदूंवर सविस्तर चर्चा झाली. पीक नुकसानीची २०२ कोटी रुपयांची भरपाई या आधीच वितरित करण्यात आलेली आहे.
Sudhir Mungantiwar : विविध तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पिकांवर कापणीपूर्वी लष्करी अळीचा झाला आहे तसेच अनेक भागात तुडतुडा रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे व सर्वेक्षण पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित विभागांच्या मदतीने शेतकर्यांना नुकसान भरपाईसाठी मदत करावी, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे यासंदर्भातील प्रशासकीय अडचणी त्वरित दूर करण्यात याव्या, याकरिता जिल्हाधिकार्यांनी स्वतः लक्ष घालून बैठका घेण्याची सूचनाही त्यांनी दिली.
नाडणार्या संस्थांवर कडक करा
धान खरेदी केंद्रांवर नोंदणी बंद ठेवून शेतकर्यांना नाडणार्या संस्थांवर वेगाने कडक कारवाई करावी, अशा सूचनाही Sudhir Mungantiwar सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनास दिल्या. कुणाच्याही गलथानपणामुळे अथवा राजकारणामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे नुकसान यापुढे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.