दिल्लीच्या खाजगी शाळेला बॉम्बची धमकी

29 Nov 2024 19:29:59
नवी दिल्ली, 
प्रशांत विहारमध्ये कमी तीव्रतेच्या स्फोटानंतर आता या घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दिल्लीच्या रोहिणी येथील एका खाजगी शाळेला शुक्रवारी ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली, दिल्ली अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. शाळेच्या परिसरात कसून शोध घेतल्यानंतर तेथे काहीही मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले. एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांकडून Venkateshwar Global School : Bomb threat वेंकटेश्वर ग्लोबल स्कूलमध्ये सकाळी १०.५७ वाजता बॉम्बच्या धमकीचा ई-मेल आला.
 
 
DELHI-SCHOOL
 
गुरुवारी ज्या ठिकाणी कमी तीव्रतेचा स्फोट झाला, त्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ही शाळा आहे. अग्निशमन दलाचे (डीएफएस) एक पथक तातडीने पोहोचले. पोलिस, बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वानपथक, डीएफएस कर्मचार्‍यांनी शाळेच्या संपूर्ण परिसराची तपासणी केली आणि झडती घेतली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही, असेही अधिकार्‍याने स्पष्ट केले.
 
 
Venkateshwar Global School : Bomb threat धमकीचा ई-मेल मिळताच शाळेच्या अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना लवकर शाळेतून सकाळी ११ वाजेपर्यंत घेऊन जावे, असे पालकांना सांगितले. परिस्थिती नियंत्रणात आहे. घाबरण्याची गरज नाही, असे शाळेने पालकांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. शाळेला त्यांच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्बची धमकी मिळाली आहे, असे व्हीजीएसच्या प्राचार्य डॉ. नमिता सिंघल यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0