आता चेष्टेचा विषय कोण झाले?

30 Nov 2024 16:22:29
वेध
- विजय कुळकर्णी
१ डिसेंबर २०१९ रोजी विरोधी पक्षनेते झाल्यावर Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात ‘मेरा पानी उतरता मेरे किनारेपर घर मत बना लेना, मै समंदर हूँ, लौटके आऊंगा!’ असे म्हटले होते. त्यावेळी विधानसभेत सर्वांत जास्त म्हणजे १०५ आमदार असलेल्या भाजपाला कसे विरोधी बाकांवर बसविले, अशी खिल्ली देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची उडविली जात होती. त्यावेळी युतीमधीलच एका मित्राला हाताशी धरून शरद पवारांनी ही खेळी केली होती. मात्र, वर्षांतच शिवसेनेचे दोन गट पडले. कमी आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री केले. अडीच वर्षे त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात युतीच्या सरकारने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. अनेक योजना आणल्या. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसही दुभंगली. अजित पवार महायुतीसोबत आले. युतीचे रूपांतर महायुतीत झाले. त्यानंतर झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का देऊन ३०-३१ खासदार निवडून आणले. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते जोशात होते. कशी जिरवली, अशाच आविर्भावात ते होते. आता २०२४ विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच पुन्हा बहुमताने सत्तेत येणार, अशी खात्री त्यांना होती. त्यामुळे महाविकास आघाडी हवेत होती.
 
 
devendra
 
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावरून महायुतीला कोंडीत पकडण्याचा डाव महाविकास आघाडीने आखला होता. बोर्ड, राम मंदिराच्या मुद्यावरून मुस्लिमांची मते आपल्यालाच मिळणार, याची खात्री त्यांना होती. कारण, लोकसभेत हा प्रयोग यशस्वी झाला होता. त्यामुळे ते निश्चिंत होते. पण, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शेवटच्या काही दिवसांत अनेक योजना जाहीर केल्या. योजनांची केवळ घोषणाच केली नाही, तर त्याची केली. त्यामुळे मतदारांमध्ये महायुती सरकारबाबत प्रचंड विश्वास निर्माण झाला. महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांना मंजुरीच दिली. त्यासाठी प्रचंड निधी उपलब्ध करून दिला. आचारसंहिता लागण्यापूर्वीच ती कामे प्रत्यक्ष सुरू झाली; नव्हे त्यापैकी शहरातील अंतर्गत रस्त्याची कामे पूर्णदेखील झाली. तर, काही आजही प्रगतिपथावर आहेत. याच घोषणांमध्ये राज्यातील महिला-युवतींसाठी महायुती सरकारने लाडकी योजना घोषित केली. ही योजना घोषित केल्यावर त्याची तातडीने अंमलबजावणी करून दिवाळीपूर्वीच महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी ७ हजार ५०० रु. थेट जमा झाले. त्यामुळे अनेक गोरगरीब बहिणींना दिवाळी आनंदात साजरी करता आली.
 
 
 
Devendra Fadnavis : रक्षाबंधन ते भाऊबीज या कालावधीत जमा झालेली ही रक्कम म्हणजे आपल्या भावाने आपल्याला टाकलेली ओवाळणीच जणू, अशी अनेक महिला देत होत्या. ही योजना अतिशय लोकप्रिय झाली. तथापि, महाविकास आघाडीने या योजनेला सुरुवातीला प्रचंड विरोध केला. एवढा पैसा कुठून आणणार? सरकारवर आधीच प्रचंड कर्ज आहे. त्यात आणखी भर पडल्याने ही योजना पुढे कशी चालविणार? इत्यादी प्रश्न उपस्थित करून महाविकास आघाडी थांबली नाही, तर त्या विरोधात न्यायालयात याचिकाही केली. त्यानंतर आमचे सरकार आल्यास आम्हीदेखील महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू करून महिलांना दरमहा ३ हजार रु. देऊ, असे गाजर महाविकास आघाडीने दाखविले. पण, लाडक्या बहिणींना ते पटले नाही. त्यांनी हाती मिळालेल्या पैशांवर विश्वास ठेवून महायुतीला प्रचंड मतदान करून मोठी भेट दिली. या योजनेला महाविकास आघाडीकडे कोणतीही तोड नव्हती. तसेच, मुद्यामुळे महाविकास आघाडीचे मराठा आणि मुस्लिम कार्ड पूर्णत: अयशस्वी ठरले. तसेच, मी पुन्हा येईन, हा आता चेष्टेचा विषय झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी ‘सामना’स दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. जनतेने ते पक्के लक्षात ठेवले होते. त्यावर प्रत्युत्तर देण्याची जनतेला प्रतीक्षा होती. विधानसभा निवडणुकीत ही प्रतीक्षा संपली आणि चेष्टेचा विषय कोण झाले, ते आपल्यासमोर आहे! 
 
- ८८०६००६१४९
Powered By Sangraha 9.0