लेबनॉनमध्ये इस्रायलचा आम्ही पराभव केला

30 Nov 2024 20:50:38
- हिजबुल्लाहचा म्होरक्या कासिमचा दावा
 
वॉशिंग्टन, 
लेबनॉनी गट Hezbollah leader Naim Qasim हिजबुल्लाहचा प्रमुख नइम कासिम याने इस्रायलविरुद्ध मोठा विजय मिळवल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी एका टीव्हीवरील भाषणात कासिमने लेबनॉनमधील अलिकडील युद्धात इस्रायलला झुकण्यास आम्ही भाग पाडल्याचा दावा केला. कासिम म्हणाला, हिजबुल्लाहच्या सततच्या प्रतिकारामुळे इस्रायलला गुडघे टेकण्यास आणि तडजोड करण्यास पाडले. हिजबुल्लाहने २००६ नंतर लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा इस्रायलचा केला आहे.
 
 
Naim Qasim
 
Hezbollah leader Naim Qasim यरूशमल पोस्टच्या वृत्तानुसार, सप्टेंबरमधील पेजर हल्ल्याचा संदर्भ देत कासिम म्हणाला की, इस्रायलला हिजबुल्लाहच्या कमांड सिस्टिमवर हल्ला करून आपले लक्ष्य साध्य करण्याची आशा होती. मात्र, असे घडले नाही आणि हिजबुल्लाहने इस्रायलच्या होम फ‘ंटवर हल्ले सुरू केले. इस्रायलला बचावात्मक स्थितीत ठेवले आणि युद्धविराम झाला.
 
 
Hezbollah leader Naim Qasim :या दरम्यान कासिमने सांगितले की, आमची मान ताठ ठेवत हा करार केला आहे. लितानी नदीच्या खाली दक्षिण लेबनॉनच्या सर्व भागांतून इस्रायली सैन्याची माघार हा या कराराचा मु‘य मुद्दा होता. आम्ही त्यास चिकटून राहिलो आणि इस्रायलला ते मान्य करावे लागले. त्यांनी हिजबुल्लाह कमकुवत होईल, अशी व्यवस्था होती, पण त्यांचा डाव पूर्णपणे फसला आहे. आमचा हा पेक्षाही मोठा विजय झाला आहे. युद्धविराम व्यवस्थेवर चर्चा करताना कासिम म्हणाला की, कराराची अंमलबजावणी करण्यासाठी लेबनीज सैन्य आणि हिजबुल्लाह यांच्यात उच्चस्तरीय समन्वय असेल. या काळात सतत लढत राहिल्याबद्दल कासिमने हिजबुल्लाहचे कौतुक केले आहे.
Powered By Sangraha 9.0