बांगलादेशात आणखी एका पुजार्‍याला अटक

    दिनांक :30-Nov-2024
Total Views |
- इस्कॉनच्या कोलकातातील दावा
 
कोलकाता, 
Priest arrested इस्कॉनचे चिन्मय प्रभू यांना बांगलादेशात अटक करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी आता आणखी एका हिंदू पुजार्‍याला चटगाव येथून अटक करण्यात आली, अशी माहिती इस्कॉनच्या कोलकात्यातील प्रवक्त्याने शनिवारी दिली. श्यामदास प्रभू असे अटक झालेल्या पुजार्‍याचे नाव आहे. ते चिन्मय प्रभू यांना भेटायला गेले असता अटक करण्यात आली.
 
 
syamdas
 
वॉरंट नसताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. श्यामदास प्रभू यांना झालेल्या अटकेबाबत कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी एक्सवर शुक‘वारी पोस्ट केली. चितगाव पोलिसांनी आणखी एक ब‘ह्मचारी श्यामदास प्रभू यांना आज अटक केली, असे या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे.
 
 
Priest arrested इस्कॉनचे बांगलादेशातील माजी सदस्य चिन्मय प्रभू देशद्रोहाच्या आरोपात सोमवारी अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेमुळे प्रक्षुब्ध हिंदू समुदायाने बांगलादेशात राजधानी ढाका व चटगावसह विविध ठिकाणी निदर्शने केली. चिन्मय प्रभूंना जामीन नाकारण्यात आल्यावर मंगळवारी पोलिस आणि आंदोलकांत हिंसाचार झाला. या सइफूल इस्लाम नावाच्या वकिलाचा मृत्यू झाला होता.
 
 
तीन मंदिरांची तोडफोड
Priest arrested जोरदार घोषणा करणार्‍या जमावाने शुक‘वारी चटगाव येथील मंदिरांची तोडफोड केली. चटगावमधील हरीशचंद्र मुनसेभ रस्त्यावरील शांतेश्वरी मातृ मंदिर, जवळच असलेले शोनी मंदिर आणि शांतेश्वरी कालिबारी मंदिरात दुपारी अडीच वाजता ही तोडफोड करण्यात आली, असे वृत्त बीडीन्यूज २४ डॉट कॉम या संकेतस्थळाने दिले. हजारो लोकांचा जमाव घोषणा देत आला. त्यांनी फेकलेल्या विटांमुळे शोनी मंदिर आणि इतर दोन मंदिरांच्या नुकसान झाले, असे मंदिर प्रशासनाच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे.