घसरणीमुळे भांडवली मूल्य ५.९९ लाख कोटींनी घटले

    दिनांक :04-Nov-2024
Total Views |
मुंबई, 
capital value of depreciation मुंबई शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच सत्रात म्हणजे सोमवारी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या विक्रीच्या दबावामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली. या घसरणीमुळे शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे भांडवली मूल्य ५.९९ लाख कोटी रुपयांनी घटले.
 
 

mumbai share bazaar 
 
 
capital value of depreciation विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली तुफानी विक्री विक्री, रिलायन्स इंडस्ट्री, बँकिंग क्षेत्रामुळे शेअर बाजार खाली आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचची निवडणूक, अमेरिकी फेडरल रिझव्र्ह पुढील आठवड्यात व्याजदरावर निर्णय घेणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ९४१ अंकांनी घसरून ७८,७८२ अंकांवर बंद झाला. ६ ऑगस्टनंतरची ही नीचांकी स्थिती आहे. दिवसभराच्या सत्रात निर्देशांकात १,४९१ अंकांची घसरण झाली होती. घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे भांडवली मूल्य ५,९९,५३९ कोटी रुपयांनी घसरून ४,४२,११,०६८.०२ कोटींवर (५.२६ ट्रिलियन) आले. पुढील काही दिवसांच्या कालावधीत अमेरिकी निवडणूक निकाल आणि फेडरल रिझव्र्हच्या धोरणात्मक निर्णयामुळे गुंतवणूकदारांनी जोखीम टाळल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. समभागांच्या वाढलेल्या मूल्यांकनाची काळजी असतानाच विदेशी निधीच्या प्रवाहाने गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनिश्चितता निर्माण केली, असे तज्ज्ञांनी सांगितले.