नरेंद्र मोदींचा श्वास ग्रामविकासाचा ध्यास

    दिनांक :05-Nov-2024
Total Views |
वेध
- हेमंत सालोडकर
जनतेचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यादृष्टीने PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात जागृती आली आहे. खेडी स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध होण्यासाठी ज्या ज्या म्हणून उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या सगळ्या उपाययोजना केंद्र सरकारच्या पंतप्रधान मोदी करीत आहेत. पंतप्रधान मोदी स्वत: एका गरीब कुटुंबातून, गुजरातच्या ग्रामीण भागातून आले आहेत. तळागाळात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या काय समस्या आहेत, याची त्यांना जाण आहे.
 
 
sasnsad
 
एक चहावाला ते देशाचा पंतप्रधान असा प्रवास त्यांनी परिश्रमपूर्वक यशस्वी केला आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी ते १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्यातील सर्व घटकांतील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. गुजरातला सर्व आघाड्यांवर पुढे नेताना त्यांनी जे परिश्रम घेतले, ज्या योजना राबविल्या, जी कल्पकता दाखविली, ती संपूर्ण देशाने अनुभवली आहे. जे गुजरातच्या बाबतीत केले, त्यांनी गुजरातला जसे पुढे नेले, तसाच प्रयत्न ते आज देशाला पुढे नेण्यासाठी आहेत. देशाला पुढे न्यायचे असेल तर नुसती शहरे विकसित करून चालणार नाही, तर ग्रामीण भागांचा कायापालट केला पाहिजे, असे मोदी यांना मनोमन वाटते. ग्रामीण विकास हा देशाच्या विकासाचा गाभा आहे आणि हा गाभा मजबूत केला पाहिजे, हे मोदींनी हेरले आहे. केंद्रात पंतप्रधानपद स्वीकारल्यापासूनच त्यांनी ग्रामीण भागांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित आहे. सूत्रे स्वीकारताच त्यांनी पहिली योजना जाहीर केली तीच ग्रामविकासाला पोषक अशी होती. सांसद आदर्श ग्राम योजना त्यांनी जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत लोकसभा आणि राज्यसभेतील प्रत्येक सदस्याने एक गाव दत्तक घ्यायचे आणि खासदार निधीतून त्या गावाचा विकास करायचा, अशी मोदींची उत्तम कल्पना होती. या योजनेचा बराच फायदा झाला, दिसते आहे. गावात चांगले रस्ते असले पाहिजेत, उत्तम शिक्षण देणारी शाळा असली पाहिजे, दर्जेदार आरोग्य केंद्र असली पाहिजे, बँकेची एक शाखा असली पाहिजे, स्वच्छतागृहे असली पाहिजेत, पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यासाठी पाण्याची टाकी असली पाहिजे.
 
 
 
स्वत: PM Narendra Modi मोदी यांनी त्यांच्या वाराणसी या मतदारसंघातील जयापूर हे गाव दत्तक घेतले होते आणि या बदललेले भाग्य आपण पाहिलेच आहे. पंतप्रधान म्हणून त्यांना देशभरातील सगळ्याच गावांचा विकास झालेला हवा आहे. त्यांनी जी योजना अंमलात आणली होती, त्या योजनेचे सकारात्मक परिणाम अनुभवास यायला लागला आहे. ग्रामीण भारताच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. अनेक योजनांची घोषणा करून त्या अंमलात आणल्या आहेत. शेतकरी खेड्यांचा आणि पर्यायाने देशाचा कणा मानला जातो. शेतकरी सुखी झाला, आनंदी राहिला, संपन्न झाला तर खेडी संपन्न होतील आणि देशही संपन्न होईल. त्यामुळे शेती आणि शेतकर्‍याला बळ देण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला. नवी पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली. या योजनेमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आणि राहणीमानात व्यापक बदल घडून येत आधीच्या पीक विमा योजनेतील सर्व त्रुटी दूर करून एक सर्वंकष अशी विमा योजना अंमलात आणल्याने शेतीचे अर्थकारण बदलल्याशिवाय राहणार नाही. शेतकर्‍यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळाले पाहिजे आणि पिके चांगली येण्यासाठी चांगली खते मिळाली पाहिजेत, यासाठीही मोदींच्या नेतृत्वातील रसायने व खते मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. शेतकर्‍यांना नीम कोटेड युरिया पुरविण्याचा क्रांतिकारी सिद्ध ठरलाच आहे. सेंद्रिय शेतीचा प्रचार केंद्र सरकारने प्रभावीरीत्या केला आहे, हेसुद्धा एक वरदान ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीच्या स्वच्छतेलाही प्राधान्य दिले. गंगा नदी शुद्धीकरणाच्या अभियानात त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी नितीन गडकरी यांनी त्यांना उत्तम सहकार्य केले, हे सर्वविदित आहे. देशातील सगळ्यात लांब नदी म्हणून ख्याती गंगेची स्वच्छता करण्याचा मोदींचा निर्णय ग्रामविकासाला हातभार लावणाराच ठरला आहे. अशा पंतप्रधानांचे आभार मानलेच पाहिजेत. 
 
- ९८५०७५३२८१