निवडणुकीची हास्यजत्रा

    दिनांक :08-Nov-2024
Total Views |
वेध
प्रफुल्ल क. व्यास
निव्वळ मनोरंजन असलेली महाराष्ट्रात ‘निवडणुकीची हास्यजत्रा' सुरू झाली आहे. या हास्यजत्रेतील पात्र तुमच्या आमच्या सरावातील आहेत. जत्रा चांगलीच भरात आली आहे. आगामी पाच दिवसांत अजून तापेल आणि शेवटच्या आठवड्यात ही जत्रा कुठल्या स्तरावर जाईल, हे सांगता येत नाही. सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले आहेत. अक्षरश: चिखलफेक सुरू आहे. अनेकदा तर आरोपासाठी मुद्दा नसताना पुढे कॅमेरा दिसताच तथ्यहीन आरोप होताना दिसतात. मतदारांना ते आता समजू लागले आहे. राजकीय शिरोमणी Sharad Pawar शरद पवार यांनी राजकारणाचा चोथा करून ठेवला आहे. राज्यातील राजकारणाला गलिच्छ करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. ‘तोडा, फोडा आणि राज्य करा' या धोरणाने ते पंतप्रधानपदापर्यंत पोहोचून त्या खुर्चीवर बसू शकले नाहीत. सोनिया गांधी यांचा विदेशीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला नसता तर कदाचित ते त्या खुर्चीवर बसू शकले असते. सोनिया गांधी पंतप्रधान होत असल्याचा काटा त्यांना रुतला होता. त्यानंतर त्यांना जिव्हारी लागले ते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री होणे! त्यावेळी त्यांनी भट, ब्राह्मण वगैरेपर्यंतची टोकाची टीका केली.
 
 
sharad dksl
 
वाढत्या वयाचा अनुभव लक्षात घेता त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव यांना गळाशी लावले. त्यांना मुख्यमंत्रीही केले. (मुलगी सुप्रिया, पुतण्या अजित पवार यांची अट न ठेवता). जगात ज्या माणसाची ‘दादा' म्हणून ओळख होती. अख्खा महाराष्ट्र ज्या व्यक्तीच्या शब्दाला मान देत होता आणि विरोधक थरथर कापत होते. ज्यांच्यापुढे भल्याभल्यांची मान वर करून बोलण्याची हिंमत नव्हती त्या शिखराएवढ्या उंच माणसाचा मुलगा किंगमेकरऐवजी Sharad Pawar शरद पवारांच्या इशाऱ्यावर नाचणारे बाहुले झाले. बाळासाहेबांचा ‘बाणा' चिरंजिवांनी मातोश्रीच्या आडावर बांधून मुख्यमंत्रिपद पदरात पाडून घेतले. त्या पदाला साजेसे असे काम केले असते तर उद्धव ठाकरेंचीही उंची वाढली असती. परंतु, त्यांना तेही सुचले नाही. त्यांच्या तोंडातून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र \डणवीस यांचाच उद्धार होत होता. बाळासाहेब हिंदुत्व जगले अन् उद्धव हिंदुत्व विसरून गेले. नव्हे ज्यांना स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्यातही लाज वाटते अशांसोबत हातमिळवणी केली. एकनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह बाहेर पडून उद्धव ठाकरे यांची नशा उतरवली. त्यामुळे उद्धव ठाकरे अधिकच चिडले. पण, ज्यांच्यासोबत त्यांनी हातमिळवणी केली, त्यांच्या लेखी उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला मान नसल्याचे स्पष्ट झाले. तिकीट वाटपाच्या वेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणीही महाविकास आघाडीतील दोन मित्र पक्षांनी कचऱ्यासारखी उडवून लावली.
 
 
महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्याच डोक्या(विचार)च्या अकबरुद्दिन ओवैसी यांनी उद्धव ठाकरे यांना केलेला सवाल म्हणजे तोंडात ‘शेण' घालण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. अकबरुद्दिन यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित जाहीर सभेत, ‘‘हिंदुत्व विचारधारेच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले. आता काँग्रेस आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना जवळ केले. तीन पक्षांची आघाडी झाली. उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा धडा राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा यांना शिकवण्यात यशस्वी झाले की नाही, "असा प्रश्न केला. अकबरुद्दिन यांनी उपस्थित केलेला प्रश्न ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सभेला जातील त्या त्या ठिकाणी साऱ्या महाराष्ट्राने विचारून त्यांना सळो की पळो करून टाकले पाहिजे. निवडणुकीच्या काळात महिनाभर २४ तास चालणाऱ्या या महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील किस्सेही गंभीर आहेत. आता Sharad Pawar शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी निवडून आल्यास बेरोजगारीची चिंता व्यक्त करीत मतदार संघातील ‘तरुणांचे लग्न' लावून देणार असल्याचे आश्वासन दिले.
 
 
अरे तुम्ही राज्यात विधानसभेत लाख-दोन लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार आहात. तुमच्या बोलण्यातून तुमची उंची, तुमचा दृष्टिकोन समजला पाहिजे. पण, तुम्ही ‘इंटरटेन्मेन्ट' करताय्! काय अपेक्षा करावी तुमच्याकडून महाराष्ट्राच्या विकासाची! काल सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या तोंडाचा उल्लेख केला. Sharad Pawar शरद पवार हे कुच्छित राजकारणी आहेत वगैरे वगैरे... पण, त्यांच्या आजारावर बोलून काय साध्य केले तर फक्त टाळ्या... आम्ही १०० टक्के मतदान करू! पण, विकास सांगणाऱ्यांनाच! फक्त टाळ्यांसाठी बोलून तोंडाची वाफ दवडण्यात अर्थ नाही... विरोधक एकवटले आहेत. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या हाती आयते कोलीत देण्याचे धाडस करू नये... अकबरूद्दिनसारखे आहेत तोंडात शेण घालायला... 
 
- ९८८१९०३७६५