मुंबई,
Mumbai airport in gold seized सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स शाखेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मेणात गुंडाळलेले १.३६ कोटी २४ कॅरेट सोने जप्त केले. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे, असे एका अधिकार्याने शनिवारी सांगितले. गुरुवारी रात्री हे सोने जप्त करण्यात आले. एका बॅगमध्ये ठेवलेल्या इनरवेअरमध्ये ते लपविले होते. निर्गमन हॉलमधील स्टाफ वॉशरूममधून बाहेर पडत असताना सीमाशुल्क अधिकार्यांनी एका प्रवाशाला अडवले.
Mumbai airport in gold seized त्याच्यासोबत बॅग घेऊन जाणारा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचा एक खाजगी कर्मचारी होता, असे अधिकार्याने सांगितले. कर्मचारी आणि प्रवाशाच्या बॅगची झडती घेतल्यावर अधिकार्यांनी मेणातील २४ कॅरेट सोन्याचे पावडर असलेले एक पॅकेट जप्त केले. त्याचे एकूण वजन १.८९२ किलो आणि निव्वळ वजन १.८०० किलो होते, ज्याचे तात्पुरते मूल्य १.३६ कोटी रुपये होते. अधिकार्यांची प्रवाशावर नजर असल्यामुळे त्याने सोने दिले होते. त्यानंतर विमानतळ कर्मचारी आणि प्रवाशाला सीमाशुल्क कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.