- नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
रायपूर,
रस्ते अपघात आणि परिणामी मृत्यूच्या वाढत्या संख्येकडे लक्ष वेधत केंद्रीय मंत्री Nitin Gadkari नितीन गडकरी यांनी, देशातील रस्ते बांधताना सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर दिला. येथील पं. दीनदयाल उपाध्याय सभागृहात इंडियन रोड काँग्रेसच्या ८३ व्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना ते म्हणाले की, भविष्यात रस्ता अभियांत्रिकीच्या चुकीमुळे अपघातात कोणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी ते स्वत:ला दोषी मानतील.
रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्राच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकून, त्यांनी सरकारी अभियंत्यांना नोकरी सोडून चांगला (तपशीलवार प्रकल्प अहवाल) बनवणारी कंपनी सुरू करण्याचे आवाहन केले आणि त्यांना प्राधान्याने काम देण्याचे आश्वासन दिले. नितीन गडकरी यांनी कृषिबहुल छत्तीसगडमधील परालीपासून बिटुमन आणि सीएनजी उत्पादनावर भर दिला. त्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होईल आणि प्रदूषणाला आळा बसेल, असे सांगितले.
त्यांनी छत्तीसगडसाठी अनेक रस्ते प्रकल्पांची घोषणा केली आणि पुढील वर्षांत या राज्यात अमेरिकेप्रमाणेच रस्त्यांचे जाळे निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. दरवर्षी रस्ते अपघातांमुळे १.५० लाख मृत्यूची नोंद होते, ती आता वाढून १.६८ लाख झाली आहे. रस्ते अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील त्रुटी सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत परंतु सदोष डीपीआरमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे, असे Nitin Gadkari गडकरी म्हणाले. आम्ही अपघात रोखण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करीत आहोत. रस्ते अपघातातील जवळपास ६० टक्के बळी हे १८ ते ३४ वर्षे वयोगटातील आहेत. जिथे अपघात होणार नाही, असे रस्ते तयार करा, असे आवाहन त्यांनी केले.
...त्यासाठी मी स्वत:ला दोषी मानेन
आम्ही ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये नियम बनवले आहेत. भविष्यात रस्ता अभियांत्रिकीमुळे अपघातात कोणाचा मृत्यू तर त्यासाठी मी स्वत:ला दोषी मानेन, असे भावनिक उद्गार नितीन गडकरी यांनी काढले. प्रकल्पांसाठी डीपीआर काळजीपूर्वक तपासल्याशिवाय कोणतीही निविदा जारी करू नये, असे Nitin Gadkari गडकरी यांनी सांगितले.