गौतम अदानींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

10 Dec 2024 17:54:32
मुंबई, 
Gautam Adani-Devendra Fadnavis : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीस यांचे अदानी अभिनंदन केले. त्यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघांमध्ये दीड तास चर्चा झाल्याचे समजते.
 
 
Gautam Adani-Devendra Fadnavis
 
Gautam Adani-Devendra Fadnavis : अदानी महायुती सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाला येऊ न शकल्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केल्याचे सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीने भाजपा आणि अदानी संबंधांचा मुद्दा उचलून धरला होता. मुंबईतील येथील जमीन अदानी यांना देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. राज्यात सत्तेत आल्यास धारावीतील अदानी समूहाचा पुनर्विकास प्रकल्प रद्द करून त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासह घरे दिली जातील, अशी घोषणा उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.
Powered By Sangraha 9.0