ममता बॅनर्जींकडे दिले जावे इंडिया आघाडीचे नेतृत्व

    दिनांक :10-Dec-2024
Total Views |
- लालूप्रसाद यादव यांची भूमिका
 
पाटणा, 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची परवानगी दिली जावी, असे राजदचे प्रमुख Lalu Prasad Yadav लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी सांगितले. भाजपाविरोधी आघाडीचे नेतृत्व स्वीकारण्याची इच्छा ममता बॅनर्जी यांनी सोमवारी व्यक्त लालूप्रसाद यादव यांची टिप्पणी समोर आली आहे. इंडिया आघाडीतील मोठा सहकारी काँग्रेस पक्षाला ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाबद्दल काही अडचण असल्यास, त्याचा कोणताही फरक पडणार नाही. इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची परवानगी ममता बॅनर्जी यांना दिली जावी, असे लालूप्रसाद म्हणाले.
 
 
Mamata-lalu
 
Lalu Prasad Yadav : ममता बॅनर्जी यांच्यासह आघाडीतील कोणताही मोठा नेता इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास असेल, तर आपल्याला कोणताही आक्षेप नाही. मात्र, याबाबतचा निर्णय सहमतीने घेण्यात यावा, असे यापूर्वी राजदचे वरिष्ठ नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले होते. इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर ममता बॅनर्जी यांनी ६ डिसेंबर रोजी नाराजी व्यक्त केली होती आणि संधी मिळाल्यास आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद विरोधकांची आघाडी चालवण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडू शकतो, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.