अर्थव्यवस्थेसाठी सर्वोत्तम करू

10 Dec 2024 19:12:03
- रिझर्व्ह बँकेेचे नियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रांचे प्रतिपादन
 
नवी दिल्ली, 
रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणून ११ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व दृष्टिकोन समजून घेऊन अर्थव्यवस्थेसाठी सर्वोत्तम काय राहील, ते काम करू, अस आरबीआयचे नवनिर्वाचित गव्हर्नर Sanjay Malhotra संजय मल्होत्रा यांनी मंगळवारी सांगितले. ते अर्थमंत्रालयाबाहेर बोलत होते.
 
 
Sanjay Malhotra
 
Sanjay Malhotra संजय मल्होत्रा सध्या अर्थ मंत्रालयात वित्त सचिव असून, सोमवारी सायंकाळी त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. ते शक्तिकांत दास यांची जागा घेणार आहेत. एकीकडे वाढती महागाई आणि मंदावत असलेला अर्थव्यवस्थेचा वेग अशी दुहेरी आव्हाने अर्थव्यवस्थेसमोर असताना ते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे स्वीकारत आहेत. महागाईचा दर नियंत्रणात शक्तिकांत दास यांनी जवळपास दोन वर्षे व्याजदर जैसे थे ठेवले होते. केवळ रिझर्व्ह बँक महागाई नियंत्रणात ठेवू शकत नाही. यात सरकारची मदत आवश्यक आहे, असे मत संजय मल्होत्रांनी व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0