विकास दर कमी होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत

10 Dec 2024 19:01:57
- महागाई-वृद्धीत संतुलन ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेसमोर आव्हान
- शक्तिकांत दास यांनी घेतला निरोप
 
मुंबई, 
देशाचा विकास दर कमी होण्यामागे अनेक घटक कारणीभूत ठरले आहेत. केवळ रेपो दर हा एकमेक घटक नाही, असे प्रतिपादन बँकेचे निवर्तमान गव्हर्नर Shaktikanta Das शक्तिकांत दास यांनी मंगळवारी केले. महागाई-वृद्धीचा समतोल राखणे हे रिझर्व्ह बँकेपुढे सर्वांत महत्त्वाचे काम आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 
Shaktikanta Das
 
माझ्या उत्तराधिकार्‍यांना बदलत्या जागतिक व्यवस्थेत दिशादर्शन करावे लागेल, सायबर धोक्यांना प्रभावीपणे सामोरे जावे लागेल आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे मध्यवर्ती बँकेचे प्रमुख म्हणून दिवशी पत्रपरिषदेला संबोधित करताना Shaktikanta Das दास म्हणाले.
 
 
नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा आर्थिक समावेशनाला चालना देण्यासोबतच सीबीडीसी आणि यूएलआयसारखे रिझर्व्ह बँकेचे उपक‘म समोर नेतील, अशी अपेक्षा दास यांनी व्यक्त केली. महागाई आणि वृद्धीत संतुलन पुनर्संचयित करणे हे सर्वांत महत्त्वाचे काम आहे, असे दास यांनी मध्यवर्ती बँकेसमोरील समस्यांची यादी वाचताना सांगितले. भारतीय लवचिक आणि मजबूत आहे तसेच जागतिक मंदीला प्रभावीपणे सामोरे जाण्याची त्यात क्षमता आहे, असे Shaktikanta Das दास यांनी सांगितले.
 
 
आपल्या सहा वर्षांच्या कारकीर्दीत रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयात उत्कृष्ट समन्वय होता. अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचा दृष्टिकोन कधीकधी भिन्न असू शकतो, परंतु आपल्या कार्यकाळात असे सर्व मुद्दे अंतर्गत चर्चेद्वारे सोडवले गेले, असे त्यांनी केले.
Powered By Sangraha 9.0