दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच!

    दिनांक :10-Dec-2024
Total Views |
- कल्याण न्यायालयाचा निर्वाळा
 
ठाणे, 
कल्याणमधील ऐतिहासिक Temple at Durgadi Fort दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे, शासनाचा त्यावेळचा निर्णय मान्य करीत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे वरिष्ठ विभागाचे न्यायाधीश ए. एस. लांजेवार यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा दावा मान्य केला. हे प्रकरण कल्याण न्यायालयातून वक्फ बोर्डाकडे वर्ग करण्याचा मुस्लिम पक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळला, अशी माहिती या खटल्यातील याचिकाकर्ते आणि हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी मंगळवारी किल्ल्याजवळ दिली.
 
 
Durgadi Temple
 
गेल्या ५० वर्षांपासून Temple at Durgadi Fort दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद, हा दोन धर्मियांमधील दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. यापूर्वी हा दावा ठाणे जिल्हा न्यायालयात होता. त्यानंतर तो कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला, असे दिनेश देशमुख यांनी सांगितले. १९७१ मध्ये ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी दुर्गाडी किल्ल्यावर असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर याठिकाणी मंदिर की मशीद, याची चौकशी करणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. या दाव्यात हिंदू समाजातर्फे अ‍ॅड. भाऊसाहेब मोडक यांनी बाजू मांडली. मशिदीला खिडक्या नसतात, पण याठिकाणी मंदिराला खिडक्या आहेत. मूर्ती ठेवण्यासाठी देवालय (चौथरा) आहे. त्यामुळे ही वास्तू मंदिर आहे, असे तेव्हा शासनाने जाहीर होते.
 
 
Temple at Durgadi Fort दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर नसून, मशीदच आहे, असा अर्ज ठाणे जिल्हा न्यायालयाकडे १९७५-७६ मध्ये दाखल झाला. त्यानंतर दोन वर्षे दावा सुरू होता. त्यानंतर हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातून वक्फ बोर्डाकडे वर्ग करावा, अशी मागणी मुस्लिम पक्षाने केली ही मागणी फेटाळत न्यायालयाने दुर्गाडी किल्ला येथे मंदिरच आहे, असे सांगत शासनाचा यापूर्वीचा निर्णय मान्य करण्यात आल्याचे याचिकाकर्ते दिनेश देशमुख यांनी सांगितले. या निर्णयाला उच्च न्यायालयात स्थगिती मिळविण्यासाठी मुस्लिम पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत.