मानवी चूक, प्रशिक्षणाच्या अभावामुळे अपघात

11 Dec 2024 20:07:20
- बेस्ट बस प्रकरणी आरटीओ अधिकार्‍यांची माहिती
 
मुंबई,
BEST bus case मानवी चूक आणि प्रशिक्षणाच्या अभावामुळे कुर्ला येथे भीषण अपघात झाला, असे मुंबई आरटीओ अधिकार्‍यांनी सांगितले. या अपघातात सात जणांना प्राण गमवावे लागले, तर ४२ जण जखमी झाले आहेत. सुरवातीला बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा संशय होता. बसचालक संजय मोरेने मद्यपान केले नव्हते, असा दावा त्याच्या केला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर लगेचच वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपास पथकाला ऑलेक्ट्रा मेक इलेक्ट्रिक बसचे ब्रेक चांगले असल्याचे समजले. कुर्ला येथील एस. जी. बर्वे मार्गावर सोमवारी रात्री बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट बेस्ट बसने पादचारी आणि वाहनांना धडक दिली.
 
 
Kurla accident
 
BEST bus case वडाळा आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी कुर्ला आगारात बसची तपासणी केली. आरटीओच्या चमूने बसची तपासणी केली असता, ब्रेक व्यवस्थित काम करीत असल्याचे निदर्शनास आले, असे एका अधिकार्‍याने सांगितले. अहवाल सादर करण्यापूर्वी त्यांना आणखी काही गोष्टींची चौकशी करायची असून, ऑलेक्ट्रा आणि बेस्टकडून काही तपशील मागवले आहेत. चालकाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन बस हाताळण्याचा अनुभव नव्हताआणि मीटर लांबीचे वाहन चालविण्याची परवानगी देण्यापूर्वी त्याला योग्य प्रशिक्षण दिले गेले नसावे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0