तीन बांगलादेशी घुसखोरांना पाच वर्षांची शिक्षा

    दिनांक :11-Dec-2024
Total Views |
मुंबई, 
Bangladeshi infiltrators : तीन बांगलादेशींना भारतात अवैध घुसखोरी आणि बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने हा निकाल दिला. मोहम्मद हबीबुर रहमान हबीब, हन्नान अन्वर हुसेन खान आणि मोहम्मद अजराली सुभानल्ला अशी त्यांची नावे आहेत. ते मूळचे बांगलादेशचे नागरिक आहेत. या तिघांनी अवैध घुसखोरी केली. या प्रकरणी एनआयएने आरोपींना ताब्यात घेतले होते.
 
 
nia
 
Bangladeshi infiltrators : एनआयए विशेष न्यायालयाने तिघांना दोषी ठरवले होते. आज आरोपींना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मोहम्मद हबीबुर रहमान हबीब, हन्नान अन्वर हुसेन खान आणि मोहम्मद अजराली सुभानल्ला या तिघांनी भारतात अवैध घुसखोरी केल्याचे मध्ये उघडकीस आले होते. पुणे पोलिसांनी वैध कागदपत्रांशिवाय पुण्यात राहणार्‍या अनेक बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल केला होता. हे तिघेही दहशतवादी संघटना अल कायदाला मदत करीत असल्याचा आरोप होता. एनआयएने ७ सप्टेंबर २०१८ रोजी या तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.