नाशिकमध्ये तीन महिन्यांत उभारणार ‘एचएएल’चा प्रकल्प

    दिनांक :11-Dec-2024
Total Views |
- वायुदलासाठी घेणार तेजसचे उत्पादन
 
नवी दिल्ली, 
HAL project : हलके लढाऊ विमान तेजस एमके-१ए चा उत्पादन प्रकल्प नाशिकमध्ये उभारला आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स अर्थात् एचएएलच्या या प्रकल्पातून पुढच्या वर्षी मार्चपर्यंत पहिले तेजस-एमके-१ए बाहेर पडेल. वायुदलाला स्क्वाड्रन पूर्ण करण्यासाठी सध्या या लढाऊ विमानाची नितांत गरज आहे. जुनी लढाऊ विमानेदेखील काढून टाकणार आहेत. हे नवीन लढाऊ विमान अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. मार्च २०२४ पर्यंत नाशिक प्रकल्प सुरू झाला, तर एप्रिलपासून उत्पादनास होण्याची शक्यता आहे.
 
 
hal
 
HAL project : या प्रकल्पामुळे बंगळुरूमधील अन्य दोन एचएएलच्या प्रकल्पांना मदत मिळणार आहे. सध्या बंगळुरूमधून दरवर्षी आठ लढाऊ विमाने तयार केली जातात. परंतु, एमके-१ए च्या पुरवठा साखळीतील समस्यांमुळे त्यांचे उत्पादनही लांबणीवर पडले आहे. त्यासाठी अमेरिकेतून इंजिन आणावे लागत आहे. यानंतरही विमान तयार करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी नाशिक येथे उभारणी होत आहे.
 
तेजस एमके-१एची वैशिष्ट्ये
तेजस एमके-१ए मध्ये प्रगत मिशन संगणक, उच्च क्षमतेचे डिजिटल विमान नियंत्रण संगणक, स्मार्ट मल्टी फंक्शन डिस्प्ले, प्रगत अ‍ॅरे रडार, प्रगत सेल्फ प्रोटेक्शन जॅमर, यासारख्या अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी हे लढाऊ विमान परिपूर्ण आहे. हे लढाऊ विमान तेजस एमके-१ सारखेच आहे, मात्र काही गोष्टी यात आल्या आहेत.