महाकुंभसाठी सायबर पोलिस स्थानक सज्ज

    दिनांक :11-Dec-2024
Total Views |
- ऑनलाईन घोटाळ्यांवर राहणार लक्ष
 
महाकुंभनगर, 
जानेवारीमध्ये प्रयागराजमध्ये होणार्‍या Mahakumbh महाकुंभाच्या आधी, उत्तर प्रदेश पोलिसांनी संभाव्य ऑनलाईन घोटाळ्यांपासून भाविकांचे रक्षण मेळा परिसरात सायबर पोलिस स्टेशनची स्थापना केली आहे, असे अधिकार्‍यांनी बुधवारी सांगितले. सायबर फसवणुकीपासून भाविकांचे संरक्षण करण्यासाठी तपशीलवार योजना तयार करण्यात आल्या आहेत, ज्यात बनावट वेबसाईट्स आणि सोशल मीडियावरील नकारात्मक क्रियांचा समावेश आहे, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी सांगितले.
 
 
Mahakumbh
 
Mahakumbh : सुरक्षेचा एक भाग म्हणून मेळा परिसरात सायबर पोलिस स्थापना करण्यात आली आहे. महाकुंभला भेट देणार्‍या अपेक्षित ४५ कोटी भाविकांची ऑनलाईन सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी संपूर्ण उत्तर प्रदेशातील सर्वोच्च सायबर तज्ज्ञ आणि अधिकार्‍यांचे पथक तयार करण्यात आले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. महाकुंभ १३ जानेवारीला सुरू होईल आणि २६ फेब्रुवारीला महाशिवत्रीच्या मुहूर्तावर त्याची सांगता होईल. राज्यातील अनुभवी अधिकार्‍यांनी आधीच पदभार आहे आणि सायबर तज्ञ आता या पदावर आहेत, असे द्विवेदी यांनी सांगितले.
 
 
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सोशल मीडियाचा कोणताही गैरवापर टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. फसवणूक करणार्‍यांनी वापरलेल्या बनावट लिंक्ससारख्या संशयास्पद क्रियांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असे द्विवेदी म्हणाले.