वेध
- विजय निचकवडे
Maharashtra politics : सध्या दोनच ठिकाणी प्रचंड गर्दी दिसते आहे, एक तर सिनेमागृहात पुष्पा-२ पाहण्यासाठी आणि म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडीत! खरं तर या दोन्ही ठिकाणी जाऊन काय पदरी पाडून घेतले जाते, माहीत नाही. पण चर्चा या दोघांचीच आहे. त्यातही मारकडवाडी तर सध्या राजकीय पर्यटनाचे ठिकाणच झाले आहे. मारकडवाडीने ईव्हीएमलाही विशेष महत्त्व मिळवून दिले. पण खरंच सोयरीक झाली, लग्न झालं आणि संसार सुरू झाल्यावर आता नवर्या दोष काढून पुन्हा नव्या पद्धतीने संसार थाटण्याचा हा खटाटोप राजकारण्यांना कामेच शिल्लक राहिली नसल्याचे सांगणारे आहे. निवडणुका होईपर्यंत लोकशाहीवर प्रचंड विश्वास दाखविणार्यांचा असा काही विश्वास लोकशाही व्यवस्थेवरून उडून जातो की, मग जनमतही बनावट वाटायला लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे सुरू आहे, ते यापेक्षा वेगळे नाही. विधानसभेचे निकाल आले आणि ईव्हीएम बदनाम झाली. लोकसभा निवडणुकीत तिनेच त्यांना गुलाल उधळण्याची संधी दिली होती. मात्र आज तीच त्यांच्या लेखी वाईट झाली.
रडगाणे सुरू झाले आणि ईव्हीएममध्ये गडबडी केल्याच्या वायफळ चर्चा जोर धरू लागल्या. या निकालाने विरोधी पक्षाला तसेही काही काम शिल्लक ठेवले नव्हते, म्हणूनच कदाचित या मुद्याला घेऊन पराभवाचे दुःख कमी सुरू झालेला आटापिटा मारकडवाडीत जाऊन पोहोचला आणि आज हे गाव जगाच्या नकाशावर चर्चेत आले. केवळ गावच नाही तर ईव्हीएम यंत्रालाही सुगीचे दिवस आले आहेत. म्हणूनच तर यंत्राच्या समर्थनार्थ असलेली मंडळी यंत्राच्या प्रतिकृती स्वागत करताना नेत्यांना भेट देऊ लागली. अवघ्या ३२४८ घरांचे गाव राजकीय पर्यटनाचा अड्डा झाले. विरोधकांचा आक्षेप यावर या गावातील अधिकाधिक मते भाजपाच्या उमेदवाराला पडलीच का? भाऊ आता, मतं पडली तरी तो उमेदवार पराभूत झाला. तुमचा निवडून आला ना...मग जिवाचा आटापिटा करून नाहकच वातावरण तयार करण्याची गरज काय? पण राज्यभरातील पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यासाठी जे केंद्र हवे होते, ते मारकडवाडीच्या निमित्ताने विरोधकांना मिळाले आणि राजकीय पयर्र्टन चांगलेच आधी बॅलेट पेपरवर प्रतीकात्मक मतदान घेण्याचा घाट घातला गेला. प्रशासनाने तो हाणून पाडल्याने ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारणार्यांना आणखीच जोर चढला.
Maharashtra politics आमदार म्हणून शपथ घेण्याऐवजी सभागृहाबाहेर पडून आमदारांनी ईव्हीएमचे रडगाणे गातं तेथेही मारकडवाडी आणली. मग गावात शरद काका गेले, उद्धवजी गेले, ईव्हीएममुळे निवडून आले असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ गेले. म्हणे, आता राहुलजी पण तेथे जाणार आहे. खरंच या विषयाला घेऊन एवढा अकांततांडव करण्याची गरज आहे का? विरोधकांनी विषय वाढविला अन् सत्तेतील आमदारही तेथे पोहोचले.
आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव घराघरापर्यंत पोहोचले. राजकीय नेत्यांसाठी ते सध्या पर्यटनाचे केंद्र झाले आहे. तेथे जाऊन जोराजोरात भाषण ठोकायचे आणि यायचे. एका गावात दोन राजकीय पक्षांचे गट असतात, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आपसूकच नेत्यांच्या येण्याने या गटांना उभारी मिळून गावातील वातावरण नाहक ताणले जाते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गाव लहान असले, तरी गावातील साक्षरतेचे प्रमाण ७२ टक्के एवढे आहे. त्यामुळे चांगलं-वाईट, चूक-बरोबर याचे मोजमाप करण्याची क्षमता आणि विचारपूर्वक घेण्याची जाण गावातील लोकांना नक्कीच असेल. अशावेळी पडलेल्या मतदानावरून राजकारण करणे आणि लोकांच्या मतांवर शंका घेणे कितपत सयुक्तिक आहे, याचा विचार विरोध करणार्यांनीच करावा. हातात संविधान घेऊन शपथ घेणारे आम्हीच संविधानाचे खरे पाईक म्हणून मिरवीत असतील आणि संवैधानिक व्यवस्थेने दिलेला कौल मान्य करण्याची समज त्यांच्यात नसेल तर लोकशाहीच्या गोष्टी अधिकार त्यांना आहे का? याचा विचार व्हायलाच हवा. ज्या ईव्हीएमने लोकसभेत तुम्हाला मोठे यश दिले; ती जर आता खराब झाली, असे असेल तर मात्र विरोधकांकडील मुद्दे संपले, असेच म्हणावे लागेल.
Maharashtra politics आज दारुण झालेला पराभव आणि त्यानंतर आलेले रिकामपण खात असल्यानेच मारकडवाडीला राजकीय संघर्षाचे केंद्र बनवून राजकीय पर्यटनाचे नवे दालन देणार्या काका-भाऊंना ते किती तारून नेते, हे सांगणे कठीण आहे. पण एक नक्की, आता कुणाला फिरायला जायचे असेल तर ‘भाऊ... चलताय् का मारकडवाडीला!’ असे म्हणायला हरकत नाही.
- ९७६३७१३४१७