Make in India"s दिल्लीतील एका रुग्णालयात नवीन रोबोट तयार करण्यात आला आहे. या रोबोटला सहा हात असून, त्याचा उपयोग रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी केला जाणार आहे. हा नवीन रोबोट मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आला असून, तो पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित आहे. अलिकडच्या वर्षांत, आधुनिक मशीन्समुळे शस्त्रक्रिया सुलभ झाल्यामुळे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयाच्या (फोर्टिस) डॉक्टरांनी नवा रोबोट तयार केला आहे. या रोबोटला एक, दोन नाही तर सहा हात आहेत. देशातील ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ यांनी सांगितले की, २००२ मध्ये पहिल्यांदा हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी रोबोटचा वापर करण्यात आला होता. तेव्हापासून अनेक प्रकारचे रोबोट आले. त्यापैकी, सहा हातांचा हा नवा रोबोट सर्वोत्तम आहे.
हेही वाचा : बिहारच्या सरकारी शाळांच्या शिक्षकांचा पर्दाफाश!
सामान्य ऑपरेशनपेक्षा कितीतरी पटीने अधिक फायदेशीर
डॉक्टर म्हणाले Make in India"s की, हृदयाच्या ऑपरेशननंतर रुग्णाला बरे होण्यासाठी साधारणपणे दहा दिवस लागतात. या शस्त्रक्रियेद्वारे रुग्ण अवघ्या ४ ते ५ दिवसांत निरोगी होऊन घरी जाऊ शकतो. या प्रक्रियेमुळे, बराच वेळ वाचतो आणि रुग्णाला अजिबात वेदना होत नाही असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज नेक्स्ट जेन सर्जिकल रोबोट लाँच करून, कार्डिओथोरॅसिक व व्हॅस्कुलर सर्जरी (CTVS), यूरोलॉजी तसेच GI शस्त्रक्रिया क्षेत्रात नवीन मानके तयार केली गेली आहेत. हा सर्जिकल रोबोट खरं तर पुढच्या पिढीतील वैद्यकीय तंत्रज्ञान आहे. जो किचकट शस्त्रक्रिया अचूक व नियंत्रित पद्धतीने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरेल. रोबोटिक-सहाय्यित शस्त्रक्रियेतील ही एक महत्त्वपूर्ण प्रगती आहे. एकूणच रुग्णांना याचा चांगला फायदा होणार आहे.
हा रोबोट कसा काम करतो?
डॉक्टरांनी सांगितले Make in India"s की, अनेकदा असे दिसून आले आहे की, जिथे शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे तिथे आपले हात पोहोचू शकत नाहीत. सर्जिकल रोबोट इतर सर्जिकल सिस्टीमपेक्षा वेगळा आहे कारण त्याचे ओपन कन्सोल डिझाइन सर्जनला शस्त्रक्रिया साइटचे 3D दृश्य दिसते. यामुळे, अचूकता वाढते Make in India"s आणि हृदयाच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात हाडे कापण्याची गरज नाही पडत. 360-अंश दृष्टी अंतर्गत संरचना अधिक स्पष्टपणे पाहण्यास अनुमती देते. ज्यामुळे, कुशलतापूर्वक अधिक कार्यक्षमतेने करता येते तसेच पोस्ट-सर्जिकल ट्रॉमा तुलनेने कमी होतो.