भाजपा नेत्याच्या मामाचे अपहरण, हत्ये प्रकरणी चौघांना अटक

    दिनांक :11-Dec-2024
Total Views |
पुणे, 
Murder case : भाजपाचे आ. योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही हत्या वैयक्तिक वैमनस्यातून केली असल्याची शंका आहे असे, पोलिसांनी बुधवारी सांगितले. पुणे शहरातील हडपसर भागातील चौकाजवळ सतीश वाघ हे सोमवारी सकाळी फिरायला गेले असता चार ते पाच जणांनी त्यांना एसयूव्हीमध्ये बसवले.
 
 
Arrest
 
Murder case ; पुणे-सोलापूर मामार्गावरील यवतजवळ ४० किलोमीटर अंतरावर त्याच दिवशी सायंकाळी त्यांची हत्या झाल्याचे आढळून आले. त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा होत्या. वाघ यांच्या हत्येची सुपारी देणार्‍या व्यक्तीला आणि अपहरण करणार्‍या तीन जणांना अटक करण्यात असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या वैयक्तिक वैमनस्यातून केली असल्याचे त्यांनी सांगितले.