संजय मल्होत्रांनी स्वीकारली रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे

    दिनांक :11-Dec-2024
Total Views |
- पुढील तीन वर्षांसाठी राहणार पदावर
 
मुंबई, 
Sanjay Malhotra संजय मल्होत्रा यांनी बुधवारी रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. ते भारताच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ सांभाळतील. मल्होत्रा यांनी मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यानंतर बुधवारी आरबीआय प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
 

Sanjay Malhotra 
 
Sanjay Malhotra संजय मल्होत्रा हे १९९० च्या तुकडीचे अधिकारी आहेत आणि राजस्थानच्या आयएएस अधिकार्‍यांमध्ये ते चौथ्या क्रमांकावर आहेत. राजस्थानमधून ते जानेवारी २०२० मध्ये प्रतिनियुक्तीवर केंद्रात आले. येथे त्यांची प्रथम ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती झाली. यानंतर ते थेट अर्थमंत्रालयात दाखल झाले. येथे ते महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत राहिले. सुधांश पंत यांच्या आधी संजय मल्होत्रांचे नाव मुख्य सचिवपदासाठी चर्चेत होते.
 
 
संजय मल्होत्रा यांना वित्त, कर, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि खाणकाम यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ३३ वर्षांचा अनुभव आहे. भारतीय रिझर्व्ह बँक महागाई नियंत्रण आणि आर्थिक वाढ मंदावणे यासारख्या आव्हानांचा सामना करीत असताना मल्होत्रा यांची नियुक्ती एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आली आहे.
 
 
Sanjay Malhotra संजय मल्होत्रा त्यांच्या तुकडीचे टॉपर आहेत. त्यांना गृहराज्य राजस्थानचे कॅडरही मिळाले. राजस्थानमध्ये ते महसूल, वित्त, आरोग्य, ऊर्जा आणि कृषी या खात्यांशी संबंधित होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरमधून कॉम्प्युटर सायन्समधील अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.