नागपूर,
football competition सहयोगनगर, डॉ. आंबेडकर फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या इलाईट डिव्हिजनच्या स्पर्धेत आज किदवई क्लबची आणि आयएफएफसी चनकापूर सोबत लढत झाली.
football competition दोघांच्याही सामन्यात २-२ गोल करीत सामना अनिर्णीत राहिला. किदवई संघातर्फे ४६ मिनिटात अभिषेक डोईफोडे व अरशद घांचीने ७८ मिनिटात गोल केला. तर आयएफएफसी चनकापूर यांच्यावतीने रवी रोकाने ८०व्या मिनिटात तर साजिद शेख याने ८२व्या मिनिटात गोल करीत सामना अनिर्णीत ठेवण्यास संघाला मजबूती दिली.