संस्कृत आणि संस्कृती रक्षण

13 Dec 2024 17:22:03
साहित्य
'Sanskrit' and 'Sanskriti ' : भारतीय संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन आणि ज्ञान आधारित संस्कृती आहे. ऋग्वेदातील ३८०० वर्षे प्राचीन ३० पांडुलिपींचा युनेस्कोने जागतिक वारसामध्ये समावेश केला आणि इतकी प्रदीर्घ, अखंड आणि पुरातन पांडुलिपी (हस्तलिखिते) जगात अतिशय दुर्मिळ आहेत, ही गोष्ट मान्य केली. ‘आधुनिक बरीच माहिती प्राचीन भारतीय हिंदू वाङ्मयामध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि आता मांडण्यात येणार्‍या नवकल्पना, आधुनिक नवीन संशोधन आणि आविष्कारांचे बरेच संदर्भ प्राचीन भारतीय शास्त्रग्रंथांमध्येही आढळतील,’ असे स्पष्ट मत ख्यातनाम अमेरिकन इतिहासकार मार्क ट्वेन यांनी व्यक्त केले आहे.
 
 
Sanskrut-2
 
भारतीय शास्त्रग्रंथांमध्ये अद्वितीय ज्ञान
आधुनिक खगोलशास्त्र, सौर यंत्रणा, अंतराळ विज्ञान आणि भू-विज्ञान विश्वरचनेशी (ब्रह्मांड) संबंधित विविध आधुनिक माहिती संस्कृत साहित्यात विपुल प्रमाणात आढळते. शरीरशास्त्र, आरोग्य विज्ञान आणि गणितासह भौतिकशास्त्रातील अनेक तथ्ये आज वेद, वेदांग आरण्यक, उपनिषद, ब्राह्मण, साहित्य, सूत्र, संहिता आणि इतर संस्कृत ग्रंथांमध्येही मुबलक होत आहेत. अर्थशास्त्र आणि नागरिकशास्त्रासह विविध सामाजिक विज्ञानांसह, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापार, व्यवसाय आणि वाणिज्य यांचे सिद्धांत देखील प्राचीन शास्त्रग्रंथांमध्ये, वाङ्मयात आढळतात. हे सार्वत्रिक, सार्वभौम मानवोपयोगी ज्ञान हे ‘रिलिजन’ सापेक्ष कर्मकांड नसून संस्कृतीचे प्राणतत्त्व अर्थात जीवन घटक आणि विश्व मानवतेचा शाश्वत वारसा आहे. वेदांमध्ये प्रकाशाच्या गतीपासून हृदयाच्या विद्युत स्पंदनांपर्यंत आणि ब्रह्मांडाच्या ऊर्जेपासून ‘पाय’ च्या सूक्ष्म मूल्यापर्यंत अगणित सूत्र आहेत. तसेच धातुशास्त्रापासून विमान शास्त्रापर्यंत अनेक प्रगत यात आहेत. पृथ्वीच्या अक्षांच्या स्पंदनपासून स्मृतीपर्यंत सर्व महत्त्वाचे विषय वैदिक ग्रंथात हाताळले आहेत. तसेच आधुनिक अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, वाणिज्य ज्ञान, समाजशास्त्र, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि प्रगत व्यवस्थापन शास्त्रापर्यंत ज्ञान त्यामध्ये संकलित करण्यात आले आहे.
 
 
नष्ट होत आहे दुर्मिळ ज्ञान
'Sanskrit' and 'Sanskriti' : प्राचीन दुर्मिळ ज्ञानाचा हा अनमोल ठेवा उपलब्ध असूनही त्याचे अध्ययन व अध्यापन सेक्युलॅरिझमविरुद्ध ठरवून या दुर्मिळ ज्ञानाचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश न केल्याने ते नष्ट होत आहे. प्राचीन भारतीय शास्त्रग्रंथांचे, पुस्तकांचे आधुनिक कालखंडानुसार औपचारिक पठन, वाचन, संवर्धन आणि अन्वेषण न झाल्याने सक्षम विद्वानांच्या पिढ्या देखील संपत आहेत आणि आज हे शास्त्रग्रंथ व प्राचीन दुर्मिळ ज्ञान-विज्ञान स्वतंत्र भारतात कायमस्वरूपी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आज १००० हून अधिक शाखा नामशेष झाल्या आहेत. कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या आधीचे अर्थशास्त्र आणि पाणिनीच्या अष्टाध्यायीपूर्वीचे व्याकरण देखील नामशेष झाले आहे. पतंजलीमुनींच्या महाभाष्यानुसार देशात वेदांच्या १,१३१ शाखा प्रचलित होत्या. आज त्यापैकी केवळ १३ शाखाच उपलब्ध आहेत. उर्वरित १,११९ शाखा देशातून नामशेष झाल्या आहेत. जर्मनीत आजही १०३ शाखा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. सर्व दुर्मिळ ज्ञानग्रंथ, शास्त्रग्रंथ जर्मन सरकारने इतके सुरक्षित ठेवले आहेत की तेथील अव्वल विद्वान त्यांचा अभ्यास करीत असतात. वैदिक मंत्रांचा अर्थ समजण्यासाठी निरुक्ताचा उपयोग होतो. निरुक्त म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती. वैदिक शब्दांचा अर्थ दुर्बोध होऊ लागल्यावर एक समानार्थी शब्दांचा कोश तयार करण्यात आला होता. त्याला निघण्टु असे म्हणत. प्राचीन काळात निरुक्त प्रचलित होते. आता भारतात केवळ एक यास्कीय निरुक्तच उपलब्ध आहे. जर्मनीमध्ये तीन निरुक्त उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. वेद संहितांच्या तुलनेत अन्य श्रेणींच्या लुप्त संस्कृत साहित्याचे परिमाण खूप जास्त आहे. वेद शाखा आणि निरुक्त सहित लाखो ग्रंथ नामशेष झाले आहेत.
 
 
यापूर्वी विविध राज्यांत ३०-४० विषय संस्कृतमध्ये होते. ते प्रमाण केवळ ४-६ विषयांपर्यंत आले आहे. तसेच विद्यार्थी व शिक्षक या दोघांचीही संख्या कमी होत आहे. त्यांना या क्षेत्रात करीअरच्या मर्यादित संधी आहेत. त्यांच्यासाठी करिअरचा अभाव देखील आहे. सर्व शाळांमध्ये देखील वेद-वेदांग, उपनिषद, आरण्यक, ब्राह्मण सूत्र, संहिता, व निरुक्त सहित समग्र संस्कृत साहित्याच्या विस्तृत वाचनामुळे विद्यापीठाच्या स्तरावर याचे अध्ययन, अन्वेषण संशोधनाची मागणी वाढेल. आज अखिल भारतीय आणि प्रादेशिक संस्कृत सेवांची देखील आवश्यकता आहे.
 
 
ज्ञान परंपरेचे संवर्धन आवश्यक
'Sanskrit' and 'Sanskriti'  : कित्येक कोटी पृष्ठांमध्ये सुविस्तृत प्राचीन संस्कृत साहित्याचा एक मोठा भाग मागील १,२०० वर्षांच्या विदेशी आक्रमणाच्या कालखंडात जाळल्यानंतर आणि नष्ट केल्यानंतरही स्वातंत्र्याच्या काळापर्यंत त्यातील अनेक दुर्मिळ ग्रंथ आम्ही जतन करून ठेवले होते. संस्कृतची कोटी (पांडुलिपी) हस्तलिखिते अद्यापही विविध पुराभिलेख कार्यालयात पडून आहेत. अद्यापही ती वाचण्यात आलेली नाहीत. त्याचे पदान्वयन अर्थात श्रेणीबद्धता, भाषांतर आणि व्याख्या आजच्या काळानुरूप, आधुनिक वातावरणातच कठीणच नव्हे नव्हे तर अशक्य आहे. स्वातंत्र्यानंतर, केंद्रीकृत नियमन आणि शासकीय शिक्षणाच्या अंतर्गत आणि काँग्रेसच्या नवोत्थानविरोधी तथाकथित सेक्युलॅरिझमच्या नावाखाली, हे अनमोल असे शास्त्रग्रंथ व ज्ञान औपचारिक मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांमधून रद्द केले आणि ते हटविले गेले. जगातील या सर्वांत जुन्या आणि सार्वत्रिक, वैश्विक महत्त्वाच्या साहित्याचे जतन करणे, संरक्षण करणे ही स्वातंत्र्यानंतरच्या सरकारांची पहिली जबाबदारी होती. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसमधील एका मोठ्या वर्गाच्या ‘हिंदू नवोत्थान विरोधी दृष्टिकोनामुळे संविधानाच्या कलम २८ मध्ये ‘रिलीजनचे शिक्षण’ पूर्णपणे प्रतिबंधित, करून आमच्या प्राचीन साहित्यातील ज्ञानाला ‘रिलिजन’ चे शिक्षण ठरवून ज्ञान-विज्ञानाचा हा अनमोल ठेवा जगापुढे येऊ दिला नाही आणि खोट्या, दांभिक धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली याचा बळी देण्यात आला.
 
 
संस्कृती नष्ट होण्याचे परिणाम
आज जगातील अनेक प्राचीन संस्कृती, जसे की मेसापोटामियाची सुमेरियन, असीरियन, अक्केडियन, बॅबिलोनियन आणि खाल्दी इत्यादी संस्कृती आणि इजिप्त, इराण, आणि रोम या संस्कृती नामशेष आणि कालबाह्य झाल्या. मात्र, ‘विश्वगुरू’ राहिलेल्या भारताच्या संस्कृतीचा अमिट प्रभाव अजूनही सायबेरियापासून सिंहला किंवा श्रीलंकेपर्यंत, मादागास्कर ते इराण आणि अफगाणिस्तानपर्यंत आणि प्रशांत महासागरीय बोर्नियो, बाली, सुमात्रा, जावा, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, थायलँड व म्यानमारसह संपूर्ण दक्षिण पूर्व आशियाई देशांव्यतिरिक्त युरोपपर्यंत स्पष्टपणे दिसून पडतो. परंतु आता हे अस्सल ज्ञान विज्ञानाने परिपूर्ण साहित्य स्वत:च्याच देशात अध्यापनात प्रतिबंधित, निषिद्ध केले आहे.
 
 
प्रत्येक शब्द ज्ञान निधी
'Sanskrit' and 'Sanskriti'  : संस्कृतच्या प्रत्येक शब्दाची रचना अफाट ज्ञानाचा कोश म्हणून करण्यात आली आहे. संस्कृतचा प्रत्येक शब्द म्हणजे जणू ज्ञाननिधीच आहे. उदाहरणार्थ ‘वन’ शब्दाची निरुक्ति वन्यते याचते वृष्टि प्रदायते इति वना: याचा अर्थ वृष्टि अर्थात पाडण्यात सहायक सिद्ध होणार्‍याला वन म्हणतात. आधुनिक हवामानशास्त्रानुसार, जंगले पावसासाठी आवश्यक ४० टक्के आर्द्रता प्रदान करतात. त्याचप्रमाणे, हृदयातील चार अक्षरे ‘ह’ ‘र’ ‘द’ ‘य’ चे सुनियोजित संयोजन हरते, ददाते, रयते, यमम् अर्थात शरीराला रक्त देते, त्यातून रक्त घेते, रक्ताभिसरण होते आणि हृदयाच्या ठोक्यांचे नियमन करते. त्याचप्रमाणे, संस्कृतच्या प्रत्येक शब्दाचा सखोल आहे. संस्कृत म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचे भांडार आहे. संस्कृत व वेदांच्या अनेक व्याकरणां (ग्रंथ) पैकी पाणिनीचे अष्टाध्यायी हे एकमेव शिल्लक आहे. हे व्याकरण ग्रंथ केवळ सर्वांत प्राचीन नाही तर सर्वाधिक सुव्यवस्थित, पद्धतशीर, संपूर्ण नियमनिष्ठ व वैज्ञानिक व्याकरण आहे. असे असंख्य ग्रंथ आणि त्यातील प्रत्येक शब्द गूढ विज्ञान आधारित आहेत.
 
 
परंपरा आणि शास्त्रशिक्षण
'Sanskrit' and 'Sanskriti'  : आमचे हे प्राचीन शास्त्र-ग्रंथ आणि त्यांचे अध्ययन, अध्यापन सांप्रदायिक कर्मकांड न ठरता समस्त मानवजातीच्या सामान्य आणि चिरंतन संस्कृतीचे अंग राहिले आहे. आमचे हे ग्रंथ आजच्या सर्व पंथ, संप्रदायांच्या जन्मापूर्वी अशा सार्वभौम मानव कल्याणाच्या पोषक ज्ञानशास्त्राचे अंग होते. सार्वभौम, सर्वकालिक व चिरंतन महत्त्वाच्या संस्कृत साहित्यातील हे ज्ञानभांडार मिथ्या सेक्युलॅरिझमचे ढोल वाजवत अभ्यासक्रमातून हटविले गेले आहे. आज, सरकारने देशातील अल्पसंख्यक संस्थांना ‘रिलिजन’च्या शिक्षणासाठी अनुदान दिले आहे. परंतु भारताच्या सार्वभौम, चिरंतन व मानवोपयोगी आणि दुर्मिळ संस्कृत वाङ्मय आणि त्यातील प्रगत ज्ञानाला सांप्रदायिक शिक्षण संबोधून शाळांमध्ये त्याचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाकडे दुर्लक्ष करणे अत्यंत दुर्दैवी आहे. वेद-वेदांग आणि संस्कृत सुयोग्य अध्यापन, शिक्षण व संरक्षणाला (जतन) ‘नॉन-सेक्युलर’ म्हणून त्यांना औपचारिक शिक्षणाच्या बाहेर ठेवून निष्प्राण करून टाकले आहे. देशाच्या राष्ट्रीय अस्मितेचे प्राणतत्त्व असलेल्या आमच्या वेदांसह संस्कृत वाङ्मयाला होणारा हा विरोध राष्ट्र आणि त्याच्या संस्कृतीच्या प्राणतत्त्वावरील आघातापेक्षा कमी नाही. शासकीय विद्यालयांमध्ये त्यांच्या अध्यापनाला गैर-सेक्युलर ठरवल्याने स्वातंत्र्यानंतर आज केंद्र व राज्य शिक्षण अभ्यासक्रमांमधून नामशेष झाले आहेत. वेद, वेदांग, उपनिषद, आरण्यक, ब्राह्मण ग्रंथ, पुराण, सूत्र ग्रंथ, खगोलशास्त्रीय आणि इतर संहिता ग्रंथ, राज्यशास्त्रीय ग्रंथ इत्यादी भारतीय वाङम्याचे उच्च प्राथमिक स्तरापासून शिक्षण फायदेशीर आहे. जर या विषयांचा अंतर्भाव प्राथमिक स्तरापासून केला असता तर या क्षेत्रातील विद्वान, आचार्य व शिक्षकांची मागणी वाढली असती आणि उच्च पातळीवर देखील अध्ययन व अध्यापन लुप्त झाले नसते.
संस्कृती ‘रिलिजन’ हून भिन्न
केवळ स्वत:च्याच उपासना पद्धतीवर, धर्मग्रंथावर, प्रेषितावर विश्वास आणि आस्था व अन्य मत- पंथाच्या अनुयायांना तो अधिकार नाकारणे, एवढेच नव्हे तर अन्य पंथियांपेक्षा धर्मीयांपेक्षा स्वत:चाच धर्म, पंथ श्रेष्ठ मानणे पाश्चात्त्यांच्या ‘रिलिजन्स’ च्या श्रेणीत भारतीय संस्कृती आणि ज्ञान-परंपरेला येत नाही. अब्राहमिक व सामी रिलिजन्सच्या एकेश्वरवादाने प्रेरित जिहाद व क्रूसेड (धर्मयुद्ध) च्या संघर्षात बाराव्या ते सतराव्या शतकाच्या दरम्यान २ कोटींहून अधिक लोक मारले गेले. भारतीय ज्ञानाची परंपरा अशी ‘एकांतवादी रिलिजन’ची अर्थात एकेश्वरवादी नाही तर बहुदेववादी अथवा अनेकेश्वरवादी (पोलीथिज्म) आहे. या संकल्पनेनुसार व्यक्ती आपली आवड, नैसर्गिक कल, रुची, मानसिकता त्याला हवी तशी उपासना करू शकतो किंवा त्याने उपासना केली नाही तरी फरक पडत नाही. म्हणजेच उपासना करण्याचे अथवा न करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. मात्र, त्याने सामाजिक मर्यादा प्रेरित कर्तव्यरूपी धर्माचे पालन केले पाहिजे अर्थातच कर्तव्याच्या मार्गावर चालणे म्हणजेच धर्म होय.
 
(पांचजन्यवरून साभार)
 
Powered By Sangraha 9.0