हैद्राबाद,
Allu Arjun Bail : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला शुक्रवारी हैदराबाद पोलिसांनी अटक केली. अलीकडेच अल्लू अर्जुनला एका सिनेमागृहात एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत पाठवल्याची चर्चा होती. आता अल्लू अर्जुनला शुक्रवारीच हायकोर्टातून जामीन मिळाला आहे.
अल्लू अर्जुनला का अटक करण्यात आली?
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'पुष्पा-2' 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचा प्रीमियर हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. येथे गर्दी वाढल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. महिला 35 वर्षांची होती. महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अल्लू आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि त्याचा अंगरक्षक संतोष यांना शुक्रवारी अटक केली आहे. हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेले असून, तेथे त्याची याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.
हेही वाचा : मध्यप्रदेशचे नवीन आयलँड रिसॉर्ट... बोटीवरच लंच-डिनरची व्यवस्था !
पोलिस स्टेशनबाहेर चाहत्यांची गर्दी
अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर पोलिस स्टेशनबाहेर चाहत्यांची गर्दी होत आहे. यासोबतच तेलंगणातील राजकारणही यावरून चांगलेच तापू लागले आहे. बीआरएस पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष केटी रामाराव यांनी याबाबत पोस्ट केली आहे. ज्यात रामाराव म्हणाले, 'राष्ट्रीय पुरस्कार विजेते अल्लू अर्जुनची अटक सत्तेत असलेल्यांची असुरक्षितता दर्शवते. मृतांच्या कुटुंबीयांप्रती मला पूर्ण संवेदना आहे. पण याला खरेच जबाबदार कोण? अल्लू अर्जुनला अशा प्रकारे अटक करू नये, विशेषत: ज्यासाठी तो थेट जबाबदार नाही अशा गोष्टीसाठी.
हेही वाचा : जादूटोण्याच्या संशयावरून तरुणाने केला वृध्दाचा गळा धडापासून वेगळा!