१२ जानेवारीला शिर्डीत भाजपाचे अधिवेशन

    दिनांक :13-Dec-2024
Total Views |
- अमित शाह, नड्डा उपस्थित राहणार
 
मुंबई, 
BJP convention in Shirdi : शिर्डी येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी, १२ जानेवारी रोजी प्रदेश अधिवेशन होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या अधिवेशनात भव्य सत्कार केला जाणार आहे.
 
 
Amit Shah-Nadda
 
BJP convention in Shirdi : १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश भाजपाने मोठा उपक‘म हाती घेतला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित हे अधिवेशन असेल. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनुसार युवकांना प्रेरित करून भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी या नवीन अभियानाची सुरुवात होणार आहे.
कार्यकर्ते उपस्थित राहणार
BJP convention in Shirdi : शिर्डी येथील अधिवेशनासाठी राज्यभरातून सुमारे १० हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. तरुणाईशी संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याने हे अधिवेशन भाजपाच्या आगामी काळातील योजनांसाठी महत्त्वाचे असेल, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.