गडचिरोली,
Banco Blue Ribbon First Prize : देशातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणार्या जिल्हा सहकारी बँका व नागरी बँका यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या हेतूने दरवर्षी बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार देण्यात येतो. 21 मार्च 2024 च्या आर्थिक स्थितीवर 2 हजार 500 ते 3 हजार कोटींच्या ठेव वृद्धी श्रेणीतील राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग नवव्या वर्षी जाहीर झालेला आहे. सदर पुरस्काराचे वितरण 28 जानेवारी 2025 ला लोणावळा येथे होणार आहे.
देशातील 370 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या श्रेणीत ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक वर्ष सन 2023-24 या वर्षात 2 हजार 500 ते 3 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या श्रेणीमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेव वृद्धी तसेच रिजर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार बँकेचे एनपीएचे प्रमाण, सीआरएआर आदी निकषात बँक पात्र झालेली असून, 31 मार्च 2024 च्या आर्थिक स्थितीवर बँकेचे ग्रॉस एनपीए 1.30 टक्के आहे. Banco Blue Ribbon First Prize बँकेने आर्थिक निकषात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल बँको समितीने राष्ट्रीय स्तरावरचा सन 2024 या वर्षाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर केलेला आहे. यापूर्वी बँकींग फ्रंटीअर्सतर्फे सन 2018, 2022 व 2024 या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार व सन 2016 ते 2023 पर्यंत बँकेला सलग 8 वर्षे बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराने बँकेला सन्मानित करण्यात आले आहे.
बँकेच्या 31 मार्च 2024 च्या आर्थिक स्थितीवर बँकेच्या एकूण ठेवी 2.087 कोटी रुपयांच्या ठेवी असून एकूण कर्ज 11.019 कोटी रुपये असून बँकेने एकूण व्यवसाय 3,706 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केलेला असून बँक 4, 000 कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल करीत आहे. बँकेच्या ठेववृद्धीमध्ये दरवर्षी 18ते 20 टक्क्यांनी वाढ होत आहे. 31 मार्च 2024 च्या आर्थिक स्थितीवर बँकेचे करंट अकाऊंट सेव्हिंग डिपॉझीटचे प्रमाण 72 टक्के असून सर्वात जास्त कासा ठेव प्रमाण असणारी भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. Banco Blue Ribbon First Prize बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नुकताच इंटरनेट बँकींगचा परवाना प्राप्त झाला असून भारतातील एकूण 370 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेच्या आर्थिक स्थितीच्या निकषावर देशातील केवळ 8 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना इंटरनेट बँकींगचा परवाना दिलेला आहे.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने 57 शाखा व 38 एटीएमच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांना अत्याधुनिक बँकींग सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. Banco Blue Ribbon First Prize सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्ह्यातील शेतकरीवर्ग, ठेवीदार, पगारदार कर्मचारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला बचतगटांचे सदस्य व हितचिंतक तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे वेळोवेळी मिळत असलेल्या सहकार्यामुळे बँकेला सन 2024 चा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी आभार मानले आहे.