जमाती जिहादचे विष

हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याचे कारस्थान

    दिनांक :13-Dec-2024
Total Views |
विश्लेषण
पूर्वार्ध 
- अश्विनी मिश्रा (दिल्ली)/सुमन दास(ढाका)
Bangladesh Jihad : बांगलादेशातील पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते सुदीप्तो (नाव बदलले आहे) म्हणाले, ‘५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना सरकार पडल्यानंतर लगेचच हिंदू समाजाच्या लोकांची घरे, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि प्रार्थनास्थळांवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू झाले. ठाकूरगावात जळून भग्नावस्थेत गेलेल्या सुनीता मंडलच्या किंकाळ्या इस्लामिक जमावाने विस्थापित झालेल्या असंख्य हिंदू कुटुंबांच्या वेदना प्रतिबिंबित करतात. पूर्णिमा भट्टाचार्य यांच्या पती, जे पुजारी होते, त्यांच्या हिंदू धर्मावरील श्रद्धेमुळे निर्घृणपणे खून करण्यात आला, तर डॉ. दीपक दास यांचा ते केवळ हिंदू असल्यामुळे शिक्षकपदावरून बरखास्त करून अपमान करण्यात आला. या घटना अशा राष्ट्राचे भीषण चित्र जिथे अल्पसंख्यकांवर भीषण अत्याचार केले जातात आणि त्यांना न्याय मिळणे निव्वळ अशक्य आहे.
 
 
Bangladesh-1
 
बांगलादेश हिंदू-ख्रिश्चन-बौद्ध एकता परिषदेच्या आकडेवारीनुसार, ४ ते २० ऑगस्ट २०२४ दरम्यान अल्पसंख्यकांवर झालेल्या हल्ल्यांनी संपूर्ण देश हादरला. यामध्ये ९ हत्या, ६९ प्रार्थनास्थळांवर हल्ले, ४ बलात्कार तर घरादारांची लूट आणि जाळपोळीच्या ९१५ गुन्ह्यांचा समावेश आहे. हिंदूंच्या दुकानांवर व्यावसायिक प्रतिष्ठानांवर ९५३ हल्ले झाले, तर घर हडप करण्याचे एक प्रकरण, जमीन बळकावण्याची २१ प्रकरणे आणि महिलांच्या लैंगिक शोषणाची ३८ प्रकरणेही नोंदवली गेली आहेत. हे सगळे आकडे धक्कादायक आहेत. तथापि, काही हिंदू संघटनांचे म्हणणे आहे की खरी प्रत्यक्षातली आकडेवारी यापेक्षाही खूप भयानक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हिंदूंच्या ७६ हत्या, पूजा, ५८९ हल्ले, ४३ बलात्कार, घरादारांची लूट आणि जाळपोळीची ४०८० प्रकरणे, हिंदूंच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर १,०६४ हल्ले, ३,२०० घरांवर कब्जा आणि १,००० हून अधिक शारीरिक अत्याचाराच्या घटना घडल्या. .
 
 
Bangladesh Jihad : दैनिक वर्तमानपत्र ‘द डेली स्टार’च्या म्हणण्यानुसार, सत्तापालट झाल्यानंतर केवळ एका तासाच्या आत, कमीत कमी २७ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची घरे, मंदिरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर झाले. बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदेच्या म्हणण्यानुसार, सत्ताबदल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच २९ जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यक हिंदूंच्या छळाच्या घटनांची नोंद झाली, जी चार दिवसांत वाढून ५२ जिल्ह्यांपर्यंत पोहोचली. ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान, ५२ जिल्ह्यांमध्ये हजारो हिंदूंची घरे, दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि मंदिरांवर हल्ले झाले. तसेच तोडफोड, लूटमार आणि जाळपोळ आली. तथापि, लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांच्या म्हणण्यानुसार, १३ ऑगस्टपर्यंत देशभरात अल्पसंख्यकांशी संबंधित हिंसाचाराच्या ३० घटनांची नोंद झाली आहे. इतकेच नव्हे तर कट्टरतावाद्यांनी देशाच्या अनेक भागात स्वदेशी समुदायांना देखील लक्ष्य केले. ‘प्रोथोम एलो अखबार’ या वृत्तपत्रानुसार, चौकशीत असे दिसून आले आहे की, ५ ते २० ऑगस्ट दरम्यान ६४ पैकी ४९ १,०६८ अल्पसंख्यकांची घरे, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि २२ प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला.
 
 
Bangladesh Jihad : वाढत्या हल्यांदरम्यान ९ ऑगस्ट रोजी देशभरात अल्पसंख्यकांच्या हक्कांसाठी निदर्शने आणि आंदोलने सुरू झाली. बांगलादेश हिंदू बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषद आणि हिंदू जागरण मंच या संघटनांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात ८ कलमी मागण्या मांडण्यात आल्या. यानंतर १३ रोजी अल्पसंख्यक हक्क आंदोलन, बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषद, बांगलादेश पूजा उत्सव परिषद, महानगर सर्बोजनीन पूजा समिती, रामकृष्ण मिशन, इस्कॉन बांगलादेशचे प्रतिनिधी, ख्रिश्चन असोसिएशन, बांगलादेश बौद्ध महासंघ आणि स्थानिक नेत्यांच्या मागणीनंतर अंतरिम सरकारकडून आश्वासन देण्यात आल्यानंतर तीन दिवस आंदोलन थांबविण्यात आले. पण अल्पसंख्यकांवर कट्टरतावाद्यांचे हल्ले सुरूच राहिले. त्यानंतर १९ सप्टेंबर बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन एकता परिषदेने ढाका येथे पत्रकार परिषद आयोजित करून सांगितले की अंतरिम सरकारने त्यांच्या मागण्यांवर कोणतेही स्पष्ट पाऊल उचललेले नाही. यामुळे ढाका विद्यापीठ, सेंट्रल शहीद मिनार, चितगावमधील लाल दिघी आणि इतर ठिकाणी निदर्शने आणि मोर्चे काढणे पुन्हा सुरू झाले.
 
 
चिन्मय प्रभूंवर आरोप
३१ ऑक्टोबर रोजी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी चा नेता फिरोज खान याने साधू चिन्मय कृष्णदास प्रभू आणि इतर १९ जणांविरुद्ध राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करून देशद्रोहाचा खटला दाखल केला. मात्र, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप सिद्ध झाला नाही. नंतर फिरोज खानला पक्षातून बडतर्फ करण्यात आले. या घटनेनंतर मोठ्या संख्येने हिंदू एकजूट होऊन रस्त्यावर उतरले. मात्र, त्यांचे आंदोलन पार पडले.
 
 
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ५ नोव्हेंबरच्या रात्री चितगावच्या हजारी गली भागात बांगलादेशी लष्कर हिंदूंवर हल्ला करताना आणि सीसीटीव्ही कॅमेरे नष्ट करताना दिसत होते. प्रसारमाध्यमांनी याचे वर्णन ‘ऑपरेशन’ असे केले. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे तोडल्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिले २२ नोव्हेंबर रोजी रंगपूर येथील जिल्हा मैदानावर ‘बांगलादेश सोमिलिटो सनातनी, जगरोन जोत’ या संघटनेची विभागीय सभा होणार होती. मात्र, सरकारची परवानगी न मिळाल्याने ही बैठक माहीगंज पदवी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे या सभेत जाहीर करण्यात आले. कुरीग्राम येथे होणार्‍या आंदोलनात सहभागी होण्यासाठी लोकांना जेव्हा बसमधून नेले जात होते जिहादी कट्टरपंथीयांनी बसेसवर हल्ला केला.
 
 
Bangladesh Jihad : यामध्ये जवळपास ३० जण जखमी झाले. २५ नोव्हेंबर रोजी जेव्हा पोलिसांनी चिन्मय प्रभू यांना ढाका विमानतळावरून अटक केली तेव्हा परिस्थिती अधिकच चिघळली. दुसर्‍या दिवशी चितगावमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली, ज्यात एका वकिलाचा मृत्यू झाला. यासाठी देखील अनेक माध्यम समूहांनी केवळ हिंदूंना दोष दिला. या संदर्भात कोणताही पुरावा नव्हता. मात्र, हिंदूविरोधी प्रसारमाध्यमांनी पक्षपाती भूमिका घेत केवळ हिंदूंनाच दोषी ठरवले. आमचे आंदोलन अहिंसक होते, असे हिंदू नेत्यांचे म्हणणे होते. मात्र, घुसखोरांनी आमच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असे या नेत्यांनी सांगितले. हिंदू आघाडीच्या एक प्रतिनिधी सुमन रॉय यांनी सांगितले की, चितगाव येथील वकिलावर कट्टरवाद्यांनी ते हिंदू असल्याने त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामुळे आता इतर हिंदू वकिलांचा जीवही धोक्यात आला आहे. यानंतर चिन्मय प्रभूच्या कायदेशीर रक्षकांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली.
 
 
धार्मिक कट्टरता
हिंदूंविरुद्धची मजहबी अर्थात धार्मिक कट्टरता आधीच दिसून येत होती. मात्र, चिन्मय प्रभू यांचे एकमेव वकील रमण यांच्यावर न्यायालयाच्या कक्षात झालेला प्राणघातक हल्ला आणि त्यांच्या चेंबरमधील तोडफोडीनेही हे सिद्ध झाले की बांगलादेशात हिंदू कुठेही सुरक्षित नाही. २६ नोव्हेंबर रोजी न्यायालयीन कामकाजादरम्यान, मुस्लिम वकिलांनी देखील रमण रॉय यांची मुस्कटबादी करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून न्यायालयात चिन्मय प्रभू आपली बाजू मांडू शकणार नाहीत, हे सुनिश्चित करता यावे.
 
 
Bangladesh Jihad : ढाका उच्च वकील बिपिन चंद्र पाल (नाव बदलले आहे) म्हणतात, न्यायालयाच्या कक्षात जे घडले ते हिंदू व्यावसायिकांविरुद्ध मुस्लिमांचा वाढता पूर्वग्रह आणि त्यांच्या हक्कांचे पद्धतशीरपणे होणारे हनन यावर प्रकाश टाकते. यावर अधिकार्‍यांच्या मौनाने अल्पसंख्यक समाजाचा न्यायालयीन व्यवस्थेवरील अविश्वास अधिकच गडद झाला आहे. न्यायपालिका निःपक्षपातीपणे गुन्हा आणि शिक्षेचा निर्णय घेईल, असे अंतरिम सरकारचे दावे असूनही, जिहादी कट्टरवाद्यांनी चिन्मय प्रभूंना न्याय मिळण्यास अडथळा आणला तेव्हा सरकार गप्प बसले. आता यात उच्च न्यायालयाचा सहभाग असल्याने हे प्रश्न निर्णायकपणे हाताळण्यासाठी सरकारवर दबाव आहे. देश जसजसा या घटना घडताना पाहत आहे, तसतशी एकता आणि न्यायाची मागणी तीव्रतेने वाढत आहे.तसे पाहता बांगलादेशात कायद्याची काय अवस्था आहे, याचा लामा नगरपालिकेत २३ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेवरून लावता येतो. ‘तलाव खोदाई’ प्रकल्पाच्या नावाखाली पत्रकार बिप्लब दास यांच्यासह अनेक हिंदूंची घरे पाडण्यात आली. कोणतीही कायदेशीर सूचना, नुकसान भरपाई किंवा पुनर्वसनाची योजना सादर न करता ही घरे पाण्यात आली. यातून प्रशासकीय अपयशापेक्षा हिंदूंविषयीचा द्वेष आणि भेदभावच अधिक दिसून येत होता, ज्यामध्ये कुटुंबांना लक्ष्य करण्यात आले. अधिकार्‍यांनी पीडितांच्या हस्तक्षेपाच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले, ज्यातून अल्पसंख्यकांच्या अधिकारांबद्दलची संस्थात्मक उदासीनता स्पष्टपणे दिसून येते.
 
 
Bangladesh Jihad : २६ नोव्हेंबरला चिन्मय प्रभूंच्या सुटकेसाठी खुल्ना येथे हिंदूंच्या शांततापूर्ण रॅलीवर उन्मादी मूलतत्त्ववाद्यांनी दगड आणि लाठ्यांसह हल्ला केला तेव्हा हिंदूंची अवस्था आणखीनच बिकट झाली. या हल्ल्याने हिंदूंना पूर्णपणे उद्ध्वस्त केले, कारण शांततापूर्ण अभिव्यक्तीही धमकावण्याद्वारे दडपली गेली. हिंदूंच्या मंदिरांवर, धार्मिक स्थळांवर सातत्याने हल्ले होत आहेत. चितगावच्या फिरंगी बाजारातील लोकनाथ आश्रम जिहादी कट्टरवाद्यांनी उद्ध्वस्त करून त्याचे अवशेषात रूपांतर केले. हिंदू समाजाच्या आध्यात्मिक हृदयावरच हा हल्ला करण्यात आला.न्यूयॉर्कमधील बांगलादेशी कार्यकर्ते सीतांगशु गुहा म्हणाले, ५३ वर्षांपासून, बांगलादेशातील कोणत्याही सरकारने धार्मिक अल्पसंख्यकांच्या जीव, वित्त व रक्षणासाठी कोणतीही अर्थपूर्ण कारवाई केलेली नाही. कोणत्याही सरकारने कधीही इस्लामिक अतिरेकाबद्दल सहानुभूती असलेल्या संस्थांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
 
 
हिंदू मंदिरांना लक्ष्य
५ ऑगस्टनंतर हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आणि प्रतीकांवरही हल्ले वाढले आहेत, या घटनांमुळे देशातील असहिष्णुतेचे, अल्पसंख्यकांची सुरक्षा आणि त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य संपुष्टात आणण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. बॉम्ब फेकण्यापासून ते पवित्र स्थळांची विटंबना आणि मौल्यवान धार्मिक वस्तूंची चोरी, प्रत्येक हल्ला दीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या हिंदूंच्या हक्कांविषयी शत्रुत्वाचा खोल, पद्धतशीर नमुना प्रकट करतो.
 
 
Bangladesh Jihad : ११ ऑक्टोबर रोजी ढाका येथील गजबजलेल्या भागात तंटी बाजार पूजा समितीच्या पंडालवर हल्ला झाला. दुर्गापूजेच्या तयारीदरम्यान, दोन हल्लेखोरांनी मंडपात पेट्रोल बॉम्ब फेकले, ज्यात चार भाविक अन्य एकजण जखमी झाला. अर्थात हल्लेेखोरांना ताबडतोब पकडण्यात आले असले तरी हिंदूंमध्ये या प्रकारामुळे प्रदीर्घ काळ दहशत निर्माण झाली. हिंसाचार येथेच थांबला नाही. दुसर्‍याच दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबरला कट्टरपंथीयांनी मोल्लाहाट उपजिल्हामधील चंद्रहाटी मंदिरावर हल्ला करून त्याचे नुकसान केले आणि मूर्ती आणि कलाकृती उद्ध्वस्त केल्या. या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात सनातनी संघटनेचे अधिक तरुण मंदिराच्या सुरक्षेची आणि हल्लेखोरांवर कारवाईची मागणी करत एकत्र आले. याआधी १० ऑक्टोबर रोजी सतखिरा जिल्ह्यातील श्यामनगर मंदिरातून मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याने दहशत अधिकच वाढली. देवी जयश्रीचा ११.६ किलो वजनाचा आणि एक कोटी बांगलादेशी टका पेक्षाही अधिक किमतीचा सोन्याचा मुकुट चोरीला गेला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा भेट म्हणून दिला होता. मात्र, अशा घटनांमध्येही गुन्हेगारांवर कारवाई होत नसल्याने हिंदूंमध्ये चिंता वाटणे स्वाभाविक आहे.
 
 
Bangladesh Jihad : पबना जिल्ह्यातील पालपारा दुर्गा मंदिरावर तर धर्मांध जिहादींंनी मध्यरात्री हल्ला केला. यावेळी महालय नुकतेच सुरू झाले होते. इस्लामिक कट्टरवाद्यांनी मंदिराची तोडफोड केली. ही घटना हिंसाचाराच्या इतर घटनांपेक्षा वेगळी होती, कारण आधीच प्रचंड दहशतीत अल्पसंख्यक हिंदूंची श्रद्धा आणि संस्कृती नष्ट करण्याचा हा प्रयत्न होता. त्यानंतर झालेल्या हल्ल्यांमध्ये हिंसाचाराचा पॅटर्न स्पष्ट होता. २ ऑक्टोबर रोजी रंगपूर सदरच्या लाहिरिरहाट आणि सुतेर पारा भागात मूर्तींची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी कट्टरपंथीयांनी बत्रिश भागातील श्रीश्री गोपीनाथ मंदिराला लक्ष्य केले. पण घाबरलेल्या व दहशतीत असलेल्या हिंदूंना कुठलाही मिळाला नाही.
 
 
२८ आणि २९ नोव्हेंबर रोजी चितगावमध्ये विध्वंसाच्या दोन मोठ्या घटना घडल्या. पाथरघाटा येथे हल्लेखोरांनी शांतनवेश्वरी मंदिर आणि जवळपासच्या दुकानांचे नुकसान केले, तर पाटिया येथे जिहादींनी इस्कॉन मंदिरातील सुरक्षेतील कमतरतेचा फायदा घेत परिसराची तोडफोड केली आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यांशी छेडछाड केली. या समन्वयित हल्ल्यांमुळे धार्मिक अल्पसंख्यकांची चिंता अधिकच वाढली २९ नोव्हेंबर रोजी पाथरघाटा येथे एक मंदिर आणि किशोरगंज येथील भैरब येथे इस्कॉनतर्फे संचालित सुविधांवर हल्ला करण्यात आला.
 
 
ईशनिंदा कायदा बनले शस्त्र
Bangladesh Jihad : बांग्लादेशच्या अस्थिर सामाजिक-राजकीय वातावरणात चुकीच्या माहितीची एक छोटीशी ठिणगी देखील जातीय कलह जंगलातील वणव्यासारखी पेटवू शकते हे देखील सिद्ध झाले आहे. किंबहुना हिंदूंना दहशतीत ठेवण्यासाठी जिहादी कट्टरतावादी प्रकारचे डावपेच अवलंबत आहेत. यामध्ये ईशनिंदा कायदा देखील एक शक्तिशाली शस्त्र बनले आहे. धर्मनिंदेचे खोटे आरोप करून कट्टरतावादी हिंदूंना त्रास देत आहेत. इतक्यात घडलेल्या घटना याचा जिवंत पुरावा आहे. ईशनिंदेचे आरोप आणि प्रक्षोभक भाषणांद्वारे व्यक्ती आणि समुदायांना दहशतीत कसे ठेवले जाते, हे या घटनांवरून उघड झाले आहे. २७ ऑक्टोबर धनारपूर गावातील मदरशाच्या विद्यार्थ्यांनी १३ वर्षीय हिंदू मुलगा हृदय पाल याच्यावर ईशनिंदेचा आरोप केला. यानंतर कट्टरवाद्यांच्या जमावाने त्यांच्या कुटुंबाला धमकावले. पीडितेच्या कुटुंबीयांनी वारंवार फोन करूनही पोलिस आले नाहीत आणि कारवाई देखील केली नाही. २८ ऑक्टोबर रोजी, फरीदपूरच्या बोआलमारी येथे ईशनिंदेच्या खोट्या आरोपाखाली जेव्हा लष्कराने त्याला ताब्यात घेतले तेव्हा कट्टरपंथीयांच्या सैन्यालाच घेरले आणि मुलाला ताब्यात देण्यासाठी दबाव आणला.
 
 
Bangladesh Jihad : पाल याची एक जुनी फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे पाल सांगत होता. अनेक महिन्यांपासून त्याने मोबाईल वापरला नसल्याचेही पुराव्यावरून स्पष्ट झाले आहे. तरीही मुस्लिमांना त्याच्या विरोधात जाण्यास प्रवृत्त केले गेले होते, विशेषत: कादिरदी पदवी मुस्लिम विद्यार्थी त्याच्या विरोधात गेले होते. कारण त्याने त्याच संस्थेत प्रवेश घेतला होता. त्याच्यावर कारवाईची मागणी करीत निदर्शने करण्यात आली. हृदय पालच्या कुटुंबीयांना धमक्या येऊ लागल्या. मात्र प्रशासकीय पातळीवर पुढाकार घेण्यात आला नाही. त्यानंतर कॉलेजचे प्राचार्य जरुज्जकमान मोल्ला यांनी हृदय पालला आपल्या कार्यालयात ठेवले आणि उन्मादी जमावापासून त्यांचे संरक्षण यानंतर लष्करी अधिकार्‍यांनी हस्तक्षेप केला. तसेच १५ ऑक्टोबर रोजी शिक्षक सुकुमार बागची यांच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप करण्यात आला होता. त्यांनी इस्लामचा अपमान केल्याची अफवा मुस्लिमांमध्ये पसरवण्यात आली. त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना धमक्या देण्यात आल्या. ईशनिंदेचा कोणताही पुरावा नसतानाही त्यांना राजीनामा द्यावा लागला. नोकरी गमावल्यानंतरही त्यांचा जीव धोक्यात आहे. 
 
- ४ ते २० ऑगस्टदरम्यान बांगलादेशात काय काय घडले?
- ७६ हिंदूंची हत्या
- ५८९ प्रार्थना-पूजा-स्थानांवर हल्ले
- ४३ हिंदू महिलांवर बलात्कार
- ४०८० प्रकरणात घरादारांची लूट आणि जाळपोळ
- १०६४ हिंदू प्रतिष्ठानांवर हल्ले
 

यावर्षी ५ ऑगस्ट रोजी झालेल्या सत्तापालटानंतर बांगलादेशचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. तेथील अल्पसंख्यक हिंदूंची हत्या त्यांची घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने लुटली जात आहेत, जाळपोळ केली जात आहे आणि महिलांवर बलात्कार होत आहेत. विशेषतः हिंदू तरुण आणि युवती हे जिहादी कट्टरतावाद्यांचे लक्ष्य आहेत. ईशनिंदेच्या खोट्या खटल्यात अडकवून त्यांचा छळ केला जात आहे. यातून लहान मुले देखील सुटलेली नाहीत.
 
 (पांचजन्यवरून साभार)