राष्ट्रीय महामार्ग ठरतोय गोवंश तस्करीचा राजमार्ग

    दिनांक :13-Dec-2024
Total Views |
पांढरकवडा, 
Cattle smuggling : राष्ट्रीय महामार्ग ४४ हा देशातील सर्वात मोठा महामार्ग असून काश्मीर ते कन्याकुमारी या महामार्गावरील अनेक गावांना विशेष महत्व आले आहे. त्यात पांढरकवडा शहर तेलंगण आणि महाराष्ट्र सीमेवरील शेवटचे मोठे गाव असल्याने याला अधिक महत्व प्राप्त झाले.
 
 
marg 44
 
यामुळे येथे आर्थिक सुबत्ता आली पण त्यासोबत या महामार्गावर सर्व प्रकारची होणारी तस्करी आणि त्यातून नव्यानेच उदयास येत असलेल्या टोळ्या यामुळे पांधरकवडा या गावाची शांत सुंदर गाव अशी ओळख नष्ट होईल, अशी भीती सर्वसामान्य लोकांना आहे. या महामार्गावर सर्वात मोठी तस्करी गोवंशाची होत असून महाराष्ट्रात ४ मार्च २०१५ पासून संपूर्ण गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाला. तरीही या राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून शेकडो गोवंश कत्तलीसाठी हैद्राबाद येथे पाठवल्या जात आहे. यामुळे गोवंश हत्याबंदी अधिनियमाचे उल्लंघन होत आहे.
 
 
Cattle smuggling : या मार्गावर दररोज अनेक वाहने आजही बिनधास्त सीमापार जात असून त्यांना संरक्षण देऊन सीमेपार पोेचवण्यासाठी तालुक्यात अनेक टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्यांना प्रतिवाहन १५ हजार रुपये मिळत असल्याने ते वेळप्रसंगी कोणाचा जीव घेण्याससुद्धा घाबरत नसल्याचे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. पांढरकवडा पोलिसांनी या वर्षभरात गोवंश हत्या प्राण्यांना क‘ूर वागणूक देणे आणि महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये तब्बल ३६ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ४४२ गोवंश, २७३ म्हशी आणि तब्बल २७ हजार किलो गोवंश मांस जप्त करून १२७ व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
 
 
यामुळे तस्करांचे मांसाचे ५४ लाख, म्हशी २३.४३ लाख आणि गोवंशाचे ६६.९८ लाख एकूण १ कोटी ४४ लाख ४१ हजार रुपयांचे नुकसान झाले. तरीही यापेक्षा १०० पट गोवंश तस्करी आजही बेधडक होत आहे. ही सर्व तस्करी मध्यप्रदेश सीमेपासून पांढरकवड्यापर्यंत येणार्‍यांना मधल्या सर्व पोलिस ठाण्यांनीच रोखणे गरजेचे आहे. महायुती सरकारने राज्यात गोसेवा आयोग निर्माण केला, गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. त्यामुळे आता ही गो-तस्करी मोडून काढण्यासाठी नवनिर्वाचित मु‘यमंत्री या महामार्गवरच्या नागपूरचेच असल्याने त्यांनी विदर्भातील गोवंश तस्करीच्या या सर्वात मोठ्या महामार्गावर गो-तस्करी विरोधात कठोर पावले उचलावीत, अशी शेकडो गो-भक्तांची मागणी आहे.