भारतातील या पाच प्रसिद्ध जैन मंदिरांना नक्की भेट द्या

13 Dec 2024 19:16:59
Famous Jain Temples भारतात अनेक हिंदू मंदिरे आहेत, जिथे तुम्ही शांतपणे बसून तुमच्या देवाचे स्मरण करू शकता.त्याचप्रमाणे जैन मंदिर देखील आहेत. तुम्हाला जैन मंदिरात जायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध पाच जैन मंदिरांबद्दल सांगणार आहोत, जिथे वास्तुकला व कलाकृती तुमचे मन जिंकतील. या मंदिरांना भेट दिल्यानंतर तुम्हाला जैन धर्माचा इतिहास व संस्कृतीची माहिती मिळेल.
 
  
jain temple
 
 
 
भारतातील प्रसिद्ध पाच जैन मंदिरे 
भारतातील दोन Famous Jain Temples सर्वात प्रसिद्ध जैन मंदिरे राजस्थानमध्ये आहेत. पहिले रणकपूर जैन मंदिर, जे केवळ राजस्थानच नाही तर संपूर्ण भारतातील प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह येथे जाऊ शकता. हे मंदिर राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील अरवली डोंगराच्या मधोमध बांधले आहे. जिथे तीर्थंकर ऋषभनाथांची पूजा केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार या मंदिरात १४४४ खांब असून त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
 
राजस्थानमधील आमेर जैन मंदिर
आमेर जैन मंदिर Famous Jain Temples राजस्थानमध्ये आहे.जे जयपूरजवळ बांधले आहे. या मंदिराची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे. लाखो लोक येथे भेट देण्यासाठी येतात.येथील भिंतींवर बारीक कोरीव काम करण्यात आले आहे. या मंदिरात भगवान पार्श्वनाथांच्या सुंदर मूर्ती आहेत. एवढेच नाही तर आजूबाजूला बाग बघायला मिळतील.

 
कल्पकजी मंदिर, तेलंगणा
कल्पकजी मंदिर तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यात आहे, जे प्रसिद्ध जैन मंदिर मानले जाते. हे मंदिर ऋषभदेवांना समर्पित आहे. हे मंदिर अनेक राज्यकर्त्यांनी बांधले. म्हणजे त्याचा इतिहास खूप जुना मानला जातो. मंदिराचे सौंदर्य पाहून तुम्हाला येथे राहावेसे वाटेल.
 
पालिताना जैन मंदिर
याशिवाय, पालिताना Famous Jain Temples जैन मंदिर, एक पवित्र जैन तीर्थक्षेत्र, गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात आहे. येथे शत्रुंजय टेकडीवर ८६३ हून अधिक जैन मंदिरे आहेत. जगातील सर्वात मोठ्या जैन मंदिरांमध्ये या ठिकाणाची गणना होते. येथे प्रत्येक धर्माचे लोक मोठ्या संख्येने डोंगर चढून दर्शन घेण्यासाठी येतात. इथून निसर्गसौंदर्याचे दर्शन घडते.
 
गोमतेश्वर जैन मंदिर
कर्नाटक राज्यातील Famous Jain Temples श्रवणबेलगोला येथे प्राचीन गोमतेश्वर जैन मंदिर आहे. हे मंदिर बाहुबलीला समर्पित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मंदिरात भगवान बाहुबलीची १८ मीटर उंचीची मूर्ती आहे, जी जगातील सर्वात उंच मूर्ती मानली जाते. या मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक येतात. तुम्ही या सर्व जैन मंदिरांना भेट देऊन देवाचे दर्शन घेऊ शकता. येथे तुम्हाला शांत वातावरण व सुंदर नैसर्गिक दृश्ये पाहायला मिळतील.
Powered By Sangraha 9.0