यवतमाळ :
Hrishikesh Bhasme : आबासाहेब पारवेकर महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहते. यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालय बॉक्सिंग स्पर्धेत पारवेकर महाविद्यालयाच्या बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी ऋषीकेश कृष्णराव भस्मे याला ९० किलो गटात सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
Hrishikesh Bhasme : अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून त्याने शानदार कामगिरी केली. प्राचार्य डॉ. उदय नावलेकर यांनी त्याचा गौरव केला. तसेच शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. दिनेश जयस्वाल आणि इतर शिक्षक व कर्मचार्यांनीही ऋषीकेश भस्मेचे अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.