- नाना पटोलेंची केंद्रीय नेतृत्वाला विनंती
मुंबई,
राज्य विधानसभा काँग्रेससह महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यात काँग्रेसला उबाठा गटापेक्षाही कमी जागा मिळाल्या. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष Nana Patole नाना पटोले यांनी केंद्रीय नेतृत्वाला पत्र लिहून, आपल्याला पदमुक्त करण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली.
Nana Patole : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांना त्यांनी हे पत्र लिहिले आहे. मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर चार पूर्ण झाली असून, आता प्रदेश काँग्रेस समिती बरखास्त करावी तसेच नवी समिती स्थापन करण्यात यावी, असे नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ १७ जागांवर यश मिळाले. तर, महाविकास आघाडीला ४९ जागांवर विजय मिळाला. तिथेच भाजपा महायुतीला विक्रमी २३४ जागांवर विजय मिळाला असून एकट्या भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.