अविश्वास प्रस्तावावरून प्रचंड गदारोळ

13 Dec 2024 18:55:19
- राज्यसभा सोमवारपर्यंत स्थगित
 
नवी दिल्ली, 
Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankar राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्यावर विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून शुक्रवारी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधी सदस्य आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. या गदारोळातच सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
 
 
Jagdeep Dhankar
 
संसदेच्या वरिष्ठ सभागृहात अविश्वास प्रस्ताव सादर करताना विरोधकांनी धनकड यांच्यावर हल्लाबोल केला. धनकड हे प्रचंड पक्षपाती आहेत, ते फक्त सरकारचे प्रवक्ते म्हणून काम करीत असल्याने, त्यांना या पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षांच्या केली. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी विरोधकांच्या आरोपांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. विरोधी सदस्य सातत्याने धनकड यांचा अपमान करीत असतात. धनकड हे शेतकरी कुटुंबातील आहेत आणि त्यांचा वारंवार अपमान होत असतो. ते एका घटनात्मक पदावर विराजमान आहेत आणि त्यांचा अपमान म्हणजे घटनेचा अपमान आहे, असा आरोपही सत्ताधारी सदस्यांनी केला.
 
 
Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankar या गदारोळातच धनकड यांनी सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांना बोलण्याची परवानगी दिली. यावेळी खडगे यांनी धनकड यांच्यावर पक्षपात करण्याचा आरोप केला. तुम्ही फक्त सत्ताधारी सदस्यांनाच जास्त वेळ बोलण्याची संधी देता आणि काँग्रेसच्या सदस्यांचा अपमान करता, असा आरोप खडगे यांनी केला. यावेळी धनकड यांनी मल्लिकार्जुन खडगे आणि सभागृहाचे नेते जे. पी. यांना या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी कामकाज संपल्यानंतर आपल्या कक्षात येण्याची सूचना केली.
Powered By Sangraha 9.0