- सुप्रीम कोर्टाचा केंद्र, पंजाब सरकारला आदेश
नवी दिल्ली,
Supreme Court : सर्वांचेच आयुष्य मौल्यवान आहे. दिल्ली-हरयाणा सीमेवर बेमुदत उपोषणावर बसलेले शेतकरी नेते जगजीतसिंग डल्लेवाल यांची प्रकृती ढासळत चालली असल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक‘वारी केंद‘ आणि पंजाब सरकारला दिला.
Supreme Court : न्या. सूर्य कांत आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या न्यायासनाने हा आदेश दिला. डल्लेवाल मागील दिवसांपासून बेमुदत उपोषणावर आहेत. हे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांची समजूत घालावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यांचे उपोषण मागे घेण्यासाठी कुठल्याही स्थितीत बळाचा वापर केला जाऊ नये, असा आदेशही न्यायालयाने महान्यायाभिकर्ता तुषार मेहता आणि पंजाब सरकारचे महाधिवक्ता गुरमिंदरसिंग यांना दिला. तुम्ही दोघांनीही या मुद्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज डल्लेवाल यांना तत्काळ वैद्यकीय उपचाराची गरज असल्याने तुम्ही त्यांना चंदीगड किंवा जवळच्या पटियाला रुग्णालयात दाखल करा, असेही न्यायालयाने सांगितले.