उभ्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक

13 Dec 2024 19:46:44
- एक ठार, तर एक गंभीर

बाभुळगाव, 
Tractor-truck accident : उभ्या ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू होऊन दुसर्‍याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना शुक्रवार, १३ डिसेंबरला सकाळी ६ च्या दरम्यान बाभुळगाव धामणगाव रस्त्यावर नांदुरा पुलाजवळ पालोतीजवळ घडली. यात राजू कुसळकर (वय ३५) हा जागीच ठार झाला असून विलास सिनन्ना चव्हाण (वय ३६) पायाला मार लागून गंभीर जखमी झाला. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून पालोतीचे रहिवासी आहेत.
 
 
Tractor-truck accident
 
शुक्रवारी सकाळी ६ वाजता राजू कुसळकर ट्रॅक्टर घेऊन कामावर मजूर घेऊन जाण्याकरीता घरून निघाला होता. मजुरांच्या प्रतीक्षेत नांदुरा पुलाच्या कडेला ट्रॅक्टर उभा करून त्यांची वाट पाहत उभा होता. तर विलास चव्हाण ट्रॅक्टरवर बसून होता. याचवेळी यवतमाळकडून जात असलेल्या एका ट्रकने भरधाव वेगात येवून ट्रॅक्टरला जबर धडक दिली. त्यात ट्रॅकर उलटा झाल्याने विलास उडी मारण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरखाली दबल्या जाऊन त्याचा पाय चेंदामेंदा झाला. तर समोर उभा असलेला राजू थेट ट्रकच्या चाकात चिरडला गेल्याने जागीच गतप्राण झाला.
 
 
Tractor-truck accident : मृतक राजू हा परिवारातील एकमेव कमावता व्यक्ती असल्याने त्याचा संसार आला. त्याच्यामागे एक मुलगा, दोन मुली, पत्नी व आई असा मोठा परिवार आहे. भरधाव ट्रकच्या धडकेनंतर अपघातग्रस्त व्यक्ती ट्रकच्या चाकाखाली आल्याचे लक्षात येताच ट्रकचालक महेंदर मलय्या (वय ३३, आदिलाबाद) याने ट्रकमधून बाहेर पडून पसार होण्याचा प्रयत्न केला. पण तेथे उपस्थित जनसमुदायाने चालकास पकडून पोलिसांच्या हवाली केले.
Powered By Sangraha 9.0