प्रसूती विभागात स्वच्छता कर्मचार्‍यांकडून पैशांची मागणी

13 Dec 2024 19:25:37
- स्वच्छता कर्मचार्‍यांचा रुग्णांच्या नातेवाईकांवर दबाव
- यवतमाळच्या अधिष्ठातांकडे तक्रार 

यवतमाळ, 
येथील Vasantrao Naik Government Medical Hospital वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या प्रसुती विभागात मोठी लूट सुरू असल्याचे उघडकीस असून गोरगरीब रुग्णांकडून येथील ‘स्वच्छता मावशी’ प्रसुती झालेल्या महिलेचे घाण कपडे धुतले असे सांगून ४०० ते ५०० रुपये घेत आहेत. अशातच ज्या रुग्णांकडे पैसे नाहीत त्या रुग्णांची ‘विवस्त्र शोभा करण्याचा’ दमसुद्धा येथील या मावशा देत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराची अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांच्याकडे चेतना राऊत यांनी तक्रार केली असून या स्वच्छता मावशांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
 
Hospital
 
Vasantrao Naik Government Medical Hospital : येथील रुग्णालयात एका महिलेची प्रसुती झाली. प्रसुतीनंतर बाळंतीण महिलेचे कपडे बदलण्याकरिता स्वच्छता कामगार मावशीने तिच्या नातेवाईकांना ५०० रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तिला नको त्या अवस्थेत बाहेर आणण्याचा दमसुद्धा दिल्याचा आरोप रुग्णांच्या घाबरलेल्या नातेवाईकांनी असून त्यांना ५०० रुपये दिल्याचेही सांगितले. याबाबत समाजसेवी चेतना राऊत यांनी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली. या संबंधित ‘मावशां’वर कारवाई करण्याची मागणीसुद्धा तक्रारीतून केली आहे. शासकीय रुग्णालयातील चौकशी समिती संबंधित मावशांवर कारवाई करीत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे
मुख्यमंत्री आंदोलन
Vasantrao Naik Government Medical Hospital : जिल्हा शासकीय रुग्णालयात यवतमाळच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमधूनही गोरगरीब रुग्ण उपचारांकरिता येतात. अशातच मोठ्या प्रमाणात अशी आर्थिक लूट होत आहे. नुकत्याच झालेल्या या प्रकाराला रुग्णालय प्रशासन जबाबदार असून रुग्णांची लूट प्रशासनाच्या सहमतीनेच अनेक वर्षांपासून होत असल्याचे समजते. रुग्णांची ही आर्थिक लूट प्रशासनाने त्वरित कारवाई करून अन्यथा हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून मांडण्यात येईल.
 
चेतना राऊत, समाजसेवी
हा गैरप्रकारच : डॉ. जतकर
रुग्णालयातील स्वच्छता मावशी पैसे मागतात, हा संपूर्ण गैरप्रकारच आहे. या प्रकरणाची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दोषींवर नक्कीच कारवाई करण्यात
 
डॉ. गिरीश जतकर
जिल्हा शासकीय रुग्णालय अधिष्ठाता
Powered By Sangraha 9.0