सावधान.... रुम हीटरचा अतिवापर मेंदूसाठी 'विष'

13 Dec 2024 18:46:43
room heaters हिवाळ्याच्या काळात प्रत्येक घरात रुम हिटरचा वापर सामान्य आहे. थंडीपासून आराम मिळवण्यासाठी लोक तासन्तास रूम हिटर चालवतात, पण त्याचा अतिवापर केल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रूम हीटरचा दीर्घकाळ वापर केवळ मेंदूसाठीच हानीकारक नाही तर शरीराच्या इतर भागांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. रूम हीटर चालवल्याने खोलीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे, डोकेदुखी, चक्कर येणे आणि थकवा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळापर्यंत ऑक्सिजनची कमतरता मेंदूच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम करू शकते, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते.

 
  
heater
 
 
 
त्वचा आणि डोळ्यांवर परिणाम
रूम हीटर room heaters चालवल्याने खोलीतील ओलावा निघून जातो. ज्यामुळे, त्वचा कोरडी व निर्जीव होऊ शकते. याशिवाय, डोळ्यांची जळजळ तसेच कोरडेपणाची समस्याही वाढते. जर तुम्ही हीटरजवळ बराच वेळ बसलात तर ते त्वचेचे निर्जलीकरण करू शकते. पुरळ किंवा खाज येऊ शकते.
श्वसन प्रणालीवर परिणाम
रूम हीटर्समधून room heaters बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. विशेषत: दमा किंवा श्वसनाच्या इतर समस्या असलेल्या लोकांना. याव्यतिरिक्त, रूम हीटरचा दीर्घकाळ वापर केल्याने नाक व घशात कोरडेपणा येऊ शकतो. ज्यामुळे, संसर्गाचा धोका वाढतो.
संरक्षण कसे room heaters करावे?
*रूम हीटर वापरताना खोलीत थोडे वेंटिलेशन ठेवा.
* खोलीत आर्द्रता राखण्यासाठी हीटरसह ह्युमिडिफायर वापरा.
* पुरेशा प्रमाणात पाणी प्या व त्वचेला मॉइश्चरायझ करा.
* रूम हीटर कमी कालावधीसाठी वापरा आणि मध्ये ब्रेक घ्या.
Powered By Sangraha 9.0