अल्लू अर्जुनला कोर्टाकडून दिलासा, तुरुंगातून सुटका

    दिनांक :14-Dec-2024
Total Views |
हैदराबाद, 
Allu Arjun released from jail 'पुष्पा 2' च्या प्रीमियरदरम्यान महिलेच्या मृत्यूप्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर अल्लू अर्जुनची शनिवारी, 14 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता सुटका करण्यात आली आहे. 13 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबादमधील त्याच्या ज्युबली हिल्स बंगल्यातून अटक करण्यात आली. हेही वाचा : 'पुष्पा' पोलिस ठाण्यातून फिल्मी स्टाईलमध्ये बाहेर VIDEO
  
 
Allu Arjun released from jail
 
 
'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत न्यायालयाच्या आदेशाची प्रत कारागृह अधिकाऱ्यांना मिळू शकली नाही. यामुळे अल्लूची सुटका झाली नाही. Allu Arjun released from jail आता, आज म्हणजेच 14 डिसेंबरला अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर आला आहे. साउथ सुपरस्टारला चिक्कडपल्ली पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते, ज्याचे अनेक व्हिडिओही समोर आले होते. अल्लू अर्जुनविरुद्ध बीएनएस कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अभिनेत्याला चौकशीसाठी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात आणण्यात आले, त्यानंतर तो न्यायालयात हजर झाला. संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अभिनेता आणि थिएटर व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला होता. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 108(1) अंतर्गत अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.