राजकोटमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महारांचा भव्य पुतळा

    दिनांक :14-Dec-2024
Total Views |
मुंबई, 
Chhatrapati Shivaji Maharaj : महाराष्ट्र सरकारने मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच पुतळा उभारण्याचे कंत्राट प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला दिले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील किल्ल्यावर मराठा योद्धा राजाचा ३५ फूट उंचीच्या मागील वर्षी ४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाल्यानंतर २६ ऑगस्टला हा पुतळा कोसळला होता.
 
 
Chhatrapati Shivaji Maharaj
 
Chhatrapati Shivaji Maharaj : हा नवीन पुतळा कांस्य धातूपासून बनविण्यात येणार असून, याची उंची ६० फूट असणार आहे. याचा पायवा १० फुटांचा असणार आहे. ही माहिती पद्मश्री पुरस्कार विजेते शिल्पकारांचा मुलगा अनिल सुतार यांनी शनिवारी दिली. पुतळ्यासाठी सुमारे ४० टन कांस्य आणि २८ टन स्टेनलेस स्टिलचा वापर करण्यात येणार आहे. हा पुतळा सहा महिन्यात पूर्ण होईल, असे ते म्हणाले. याआधी उभरण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वादाला सुरुवात झाली होती. सत्ताधारी महायुती सरकारने निकृष्ट पुतळा बांधून १७व्या शतकातील मराठा साम‘ाज्यांच्या संस्थापकांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. घटनेनंतर पोलिसांनी शिल्पकार-कंत्राटदार जयदीप आपटे, सल्लागार चेतन पाटील आणि फॅबि‘केटरला अटक केली होती. त्यानंतर सरकारने नवा भव्य पुतळा उभारणीसाठी समिती स्थापन केली होती.