मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
निकाल कित्येक दिवस लोटले आणि अजूनही सरकार स्थापन केले जात नाही, सरकार स्थापन होऊन कित्येक दिवस लोटले आणि अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, गृहमंत्री नसल्याने राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप, शिल्लक सेनेचे अर्थात उबाठा गटाचे प्रमुख Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या पगारी नोकराने केले असून, जरा जरी लाज लज्जा शिल्लक असेल तर, बांगलादेशातील हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारावर सरकारने काय केले ते सांगावे, असे आव्हान देखील त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे.
हेही वाचा : VIDEO: हाशिम बाबा टोळीचा शूटर सोनू मटका चकमकीत ठार
२०१९ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर २०१९ ला लागले होते. यावेळी भाजपाला १०५ आणि शिवेसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. त्यात १० अपक्षांचा पाठिंबाही त्यामुळे सरकार स्थापन होण्यात कुठल्याही अडचणी नव्हत्या. पण तरीदेखील महाराष्ट्राचं सरकार २८ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणून Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आणि त्यांच्यासह एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या सहा लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, मंत्रिपदाची घेतलेले सहा मंत्री हे तब्बल १५ दिवस बिनाखात्याचे मंत्री होते. ठाकरेंनी अडीच वर्षांत मंत्रालयात केवळ दोनवेळा जाण्याचा आणि घरी बसून सरकार चालविण्याचा जसा रेकॉर्ड केलाय्, तसाच राज्याच्या राजकीय इतिहासात बिनखात्याचे मंत्री ठेवण्याचा बहुमानदेखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्राप्त आहे.
हेही वाचा : सावधान, रात्र वैर्याची आहे...
मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या १५ दिवसांनंतर अर्थात १३ डिसेंबर रोजी तत्कालीन सन्माननीय Uddhav Thackeray उद्धव ठाकरे साहेब यांनी आपल्या सहा मंत्र्यांना खाते वाटप केलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे ३० डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला होता. २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार्या उद्धव ठाकरेंनी ३० डिसेंबरला आपलं मंत्रिमंडळ बनवलं होतं. अर्थात तब्बल महिन्याभरानं सरकार स्थापन झालं आणि सरकार स्थापन होऊनही १५ दिवस गृहमंत्री नव्हता आणि त्याच्या महिनाभरानंतर पूर्ण मंत्रिमंडळ स्थापित झाले होते. हे येथे आवर्जून अधोरेखित केलं पाहिजे. असे सगळे विश्वविक्रम यांच्याच नावाने असताना, उलट रेकॉर्ड होल्डरच इतरांच्या नावाने ‘‘निकाल लागून पंधरवडा उलटला आणि अजूनही सरकार स्थापन केले जात नाही, सरकार स्थापन होऊन कित्येक दिवस लोटले, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन काळ लोटला असूनही, मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, गृहमंत्री नसल्याने राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडली’’ असल्याप्रकारचा थयथयाट करताना दिसत आहेत. हा प्रकार खरंच लाज विकल्याचं किंवा लाज, लज्जा, शरम उरली नसल्याचं द्योतक म्हणावे लागेल.
आता आठवला हिंदू
केंद्र सरकार देशातल्या प्रश्नांबाबत गंभीर नाही असा आरोप करत, बांगलादेशात हिंदूवर हल्ले सुरू आहेत. अत्याचार केले जात आहे. मंदिरं तोडली जात आहेत. इस्कॉन मंदिर जाळलं गेलं. मंदिराच्या प्रमुखांना अटक केली जात आहे. असा स्थितीत आपले विश्वगुरू हे अत्याचार का पाहात बसले आहेत, असा सवाल उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला. पंतप्रधान बांगलादेशबाबत निर्णय का घेत नाही असा प्रश्नही त्यांनी निमित्ताने उपस्थित केला. त्याचबरोबर केंद्राने बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्या अत्याचाराबाबत काय पावलं उचलली आहेत हे स्पष्ट करावे अशी मागणीदेखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ‘एक है तो सेफ है’ पण इथं मंदिरच सेफ कुठे आहेत. त्यामुळे लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर भाजपा आणि मोदींनी बांगलादेशबाबत बोलावं असे आव्हान ठाकरे दिलं आहे.
हेही वाचा : अल्लू अर्जुनला कोर्टाकडून दिलासा, तुरुंगातून सुटका
बरं वाटलं Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंना हिंदूंची देखील काळजी वाटते हे ऐकून. कारण मागील काळात ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना, पालघर येथे एका समूहाने पोलिसांच्या उपस्थितीत दोन साधू-संतांची हत्या केली. तेव्हा बांगलादेशातील हिंदूंचा कळवळा आलेल्या उद्धव ठाकरेंच्या चेहर्यावर जराही लवलेश दिसला नाही. त्यावेळी हेच उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदू साधूंची हत्या असल्याच्या गैरसमजातून झाली. अमरावतीत सर तन से जुदा म्हणत मेडिकल शॉप चालविणारे उमेश कोल्हेंची कट्टरपंथीयांनी गळा कापून निघृण हत्या केली. तेव्हा आमचे हिंदूचे कैवारी उद्धव साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि हा प्रकार दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात झाल्याचा बनाव करण्यासाठी अमरावतीच्या पोलिस आयुक्तांवर त्यांनी दबाव टाकला होता. कर्जतच्या प्रतीक पवारने नूपुर यांची पोस्ट शेअर केली त्यामुळे शांतिदूतांनी प्रतीकवर हल्ला केला. तेव्हाही आपले उद्धवसाहेबच मुख्यमंत्री होते.
Uddhav Thackeray : अनंत करमुसेचं अपहरण करून उद्धव साहेबांच्या एका मंत्र्यानं बिहारप्रमाणे कृत्य करत बंगल्यावर आणून मारहाण केली, समाजमाध्यमांवरील पोस्ट शेअर केली म्हणून, निवृत्त नेव्ही ऑफिसरला बेदम मारहाण करत त्यांचा डोळा फोडणारे साहेबांचे कायकर्ते होते, उखाड दिया म्हणत राणावत यांचे उद्धव साहेबांच्या सरकारने विशेष आदेश देत घर पाडले, यांचे वसुलीचं पितळ उघडं पडू नये म्हणून मनसुख हिरेण यांची हत्या यांच्याच पोलिसांनी केली. हिरेण, कंगना, करमुसे, प्रतीक, उमेश आणि दोन साधू हे सगळे पीडित हिंदूच होते. आणि हा सगळा अत्याचार हिंदूंवर उद्धव साहेबांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात झाला. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. त्या सरकारचे प्रमुख उद्धव साहेब स्वतः होते. ज्यांना आपल्या राज्यात हिंदूंना सुरक्षा देता आली नाही. जे आपल्या भाषणाची सुरुवात ‘‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आणि मातांनो’’ अशा शब्दांनी करणारे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर ‘‘माझ्या तमाम देशभक्त, देशप्रेमी बंधँनो, आणि मातांनो’’ अशा शब्दाने सुरुवात करू लागले. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं सातत्यानं सांगत दुसरीकडे स्वतःच्या वडिलांना सन्मानानं या महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेली हिंदुहृदयसम्राट ही पदवी देखील त्यांच्या नावासमोर लावण्याची हिंमत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा मंच सामायिक करताना करू शकत नसलेल्या उद्धव ठाकरेंना, बांगलादेशातील हिंदुत्वाचा अचानक कळवळा आल्याचा देखावा करणार्या उद्धव ठाकरेंना लाज, लज्जा, शरम वाटणे अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे थेट पंतप्रधानांवर बोलण्याची लायकी किंवा औकात ठाकरेंची नाही, हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे.
- ९२७०३३३८८६