शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी विधानभवनासमोर ठिय्या आंदोलन !

14 Dec 2024 17:39:09
मानोरा, 
सन २०२३ या आर्थिक वर्षीत खरीप हंगामात farmers protest तुरळक पाऊस पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. सोयाबीन पिकावर यल्लो मोझॅक, कपाशीवर लाल्या या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकांची नासाडी झाली असताना नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दुष्काळ निधी मंजूर करण्याची मागणी सर्वंच स्तरावरुन करण्यात आली.
 
 

farmers protest 
 
 
परंतु राज्य शासनाने farmers protest कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत जाहीर केली नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे याबाबत सतत निवेदन,स्मरणपत्रे देऊन,पाठपुरावा करून त्यामुळे खालील मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड,पंचायत समितीच्या सदस्या छाया राठोड यांच्या नेतृत्वात १८ डिसेंबर २०२४ पासून हिवाळी अधिवेशनात विधानभवनासमोर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना घेऊन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असून, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी वनाधिकारी सिद्धार्थ देवरे, तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा, शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर, प्रा.जय चव्हाण उपस्थित राहणार आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. उपरोक्त आंदोलन विधानभवनावर होणार असून, शेतकर्‍यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राजू नाईक, रामराव चव्हाण, डॉ. गणेश राठोड, रवी जाधव, साहेबराव राठोड, गजानन डोलारकर, गोपीचंद चव्हाण, बाळा चव्हाण, राम ढंगारे यांनी केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0