महाकुंभ नगर,
Anti-drone system at Mahakumbh : महाकुंभात सहभागी होणार्या भाविकांच्या सुरक्षेसाठी येथे बळकट यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. परिसरात उड्डाण करणार्या सर्व ड्रोनवर मध्यवर्ती ठिकाणावरून तज्ज्ञ नजर ठेवणार आहेत. ही ड्रोनविरोधी यंत्रणा शुक्रवारी तैनात करण्यात आली असून, या यंत्रणेने यशस्वीरीत्या दोन यूएव्हीला रोखले, अशी माहिती उत्तरप्रदेश सरकारने निवेदनात दिली. ड्रोनविरोधी यंत्रणेच्या व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांना सामील करण्यात आले आहे. हे तज्ज्ञ मध्यवर्ती ठिकाणी तैनात आणि आसपासच्या परिसरात उडणार्या सर्व ड्रोन्सवर सतत नजर ठेवतात. आवश्यक असल्यास कोणतेही संशयास्पद ड्रोन उड्डाण करीत असताना निष्क्रिय करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
Anti-drone system at Mahakumbh : कुंभ परिसरात ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी या अत्याधुनिक यंत्रणेने परवानगीशिवाय उड्डाण करणारी दोन डोन ड्रोन्स यशस्वीपणे पाडून निष्क्रिय या ड्रोन्सच्या ऑपरेटरर्सला नोटीस बजवण्यात आल्या, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी सांगितले. महाकुंभ नगर परिसरात पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडवले जाणार नाहीत. कोणत्याही ड्रोन ऑपरेशनसाठी पोलिसांकडून आधीच परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय ड्रोन उड्डाण करीत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. महाकुंभात जगभरातील जवळपास ४५ भाविक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. महाकुंभ हा जगातील सर्वांत मोठा मेळावा आहे.