Mahakumbh 2025 सनातन धर्मात विशिष्ट तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे जीवनासाठी अत्यंत शुभ मानले जाते. परंतु, महाकुंभाच्या शाही स्नानाच्या तिथींवर स्नान केल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करतो. यावेळी, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ आयोजित केले जात आहे. या जत्रेच्या प्रारंभाची ऋषी-मुनी आतुरतेने वाट पाहत असतात. असे मानले जाते की, महाकुंभातून शुभ वस्तू घरी आणल्याने घर आणि कुटुंबात नेहमी सुख-शांती राहते आणि सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. जर तुम्ही महाकुंभला जाण्याचा विचार करत असाल, तर इथे सांगितलेल्या गोष्टी नक्की घरी आणा. ज्यामुळे, तुमचे आयुष्य चांगले होईल आणि यशाचा मार्ग खुला होईल.
नकारात्मक उर्जेपासून मुक्ती मिळेल
प्रयागराजमध्ये Mahakumbh 2025 गंगा, यमुना व सरस्वती यांची भेट होते. त्यामुळे, याला त्रिवेणी संगम असे म्हणतात.संगम घाटावर स्नान केल्यानंतर पाणी जरूर आणा, कारण त्रिवेणी संगमाच्या पाण्यात गंगा, यमुना आणि सरस्वतीचे पाणी असते. असे मानले जाते की, त्रिवेणी संगमातून पाणी आणल्याने घरामध्ये आनंद येतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच सकारात्मक ऊर्जा वाढते.
सर्व ग्रह दोष दूर होतील
पौराणिक Mahakumbh 2025 कथेनुसार, जेव्हा देव व दानवांमध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा प्रयागराजमधील अमृत कलशातून अमृताचे काही थेंब पडले. यासाठी, प्रयागराजची माती अत्यंत शुभ मानली जाते. अशा परिस्थितीत महाकुंभाची माती तुम्ही घरी आणू शकता. असे मानले जाते की, महाकुंभाची माती आणल्याने व्यक्तीचे सर्व ग्रह दोष दूर होतात.
कुटुंबात सुख-शांती राहील
याशिवाय, तुम्ही महाकुंभातून पूजेची फुले घरी आणू शकता. असे मानले जाते की, महाकुंभ पूजेची फुले घरी आणल्याने कुटुंबात सदैव सुख-शांती नांदते आणि जीवनातील दु:ख, संकटे दूर होतात.
कुंभ Mahakumbh 2025 महोत्सव २०२५ शाही स्नान तारखा
१४ जानेवारी २०२५ - मकर संक्रांती
२९ जानेवारी २०२५ - मौनी अमावस्या
०३ फेब्रुवारी २०२५ - बसंत पंचमी
१२ फेब्रुवारी २०२५ - माघी पौर्णिमा
२६ फेब्रुवारी २०२५ - महाशिवरात्री