कीव,
रशिया आणि युक्रेनमध्ये
Russia-Ukraine war युद्ध सुरूच आहे. रशियाच्या वेगवान हल्ल्यांना युक्रेननेही प्रत्युत्तर दिले आहे. युक्रेनने रशियाच्या चेचन्या भागातील नॅशनल गार्ड कंपाऊंडवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आता भयावह रूप धारण करत आहे. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी विचारही केला नसेल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केले आहे. युक्रेनने रशियाच्या चेचन्या भागातील नॅशनल गार्ड कॉम्प्लेक्सवर शक्तिशाली ड्रोन हल्ला केला आहे. रशियाने केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यानंतर कीवने हा प्रत्युत्तर देणारा हल्ला केला आहे.
हेही वाचा : VIDEO : इस्रायलचा सीरियावर दशकभरातील सर्वात मोठा हल्ला
दोन ड्रोन खाली पाडले
सोशल मीडियावर उपलब्ध Russia-Ukraine war असलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये स्फोटापूर्वी चेचन्याची राजधानी ग्रोझनीवर आकाशात एक ड्रोन दिसला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. हल्ल्याचा हा भाग युक्रेनच्या सीमेच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे 800 किलोमीटर अंतरावर आहे. चेचन्याचे नेते रमझान कादिरोव्ह यांनी पुष्टी केली की ड्रोनने अखमत ग्रोझनी पोलिस बटालियनच्या जागेवर धडक दिली. ते म्हणाले की हवाई सुरक्षा दलांनी आणखी दोन ड्रोन पाडले आहेत.
युक्रेन वेगाने हल्ले करत आहे
इतकेच नाही तर युक्रेनने Russia-Ukraine war याआधी रशियाच्या दक्षिण भागात ड्रोन हल्ले केले होते. युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आणि मोठ्या इंधन डेपोला आग लागली. युक्रेनच्या जनरल स्टाफने सांगितले की, युक्रेनच्या ड्रोनने रात्री दक्षिण रशियातील ओरिओल भागातील एका मोठ्या इंधन डेपोला लक्ष्य केले. जनरल स्टाफ आणि रशियन टेलिग्राम वृत्तवाहिन्यांनी प्रकाशित केलेल्या छायाचित्रांमध्ये इंधन डेपोमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत असल्याचे दिसून आले.
हेही वाचा : नेपाळमध्ये ५ वर्षातून एकदा गढीमाई जत्रा भरते, लाखो प्राण्यांचा बळी
रशियानेही भयानक हल्ले केले
रशियाने आपल्या Russia-Ukraine war शेजारील देशावर 93 क्रूझ आणि बॅलेस्टिक मिसाईल आणि सुमारे 200 ड्रोन डागल्यानंतर युक्रेनकडून हे हल्ले केले जात आहेत. रशिया लाखो लोकांना दहशत माजवत असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. त्याच वेळी, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की रशियन लष्कराने युक्रेनमधील महत्त्वाच्या इंधन आणि ऊर्जा केंद्रांवर लांब पल्ल्याच्या अचूक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला आहे.