गुगलच्या टॉप ट्रेंडिंग सर्च लिस्टमध्ये राम मंदिराचे नाव

17 Dec 2024 13:28:46
Year Ender 2024 वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले असून, त्यानंतर २०२५ हे नवीन वर्ष सुरू होणार आहे. वर्षभरात, लोक Google वर सर्व प्रकारच्या गोष्टी शोधतात, ज्याची यादी Google द्वारे वर्षाच्या शेवटी जारी केली जाते. या यादीनुसार, गुगलच्या टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये राम मंदिराचे नाव देखील समाविष्ट आहे.
 
 

ayodhya 
 
 
 
२०२४ हे वर्ष धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय शुभ व ऐतिहासिक ठरले. २२ जानेवारी २०२४ रोजी जवळपास ५०० वर्षांची प्रतीक्षा संपलीव प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनासोबतच रामललाच्या मूर्तीचीही स्थापना करण्यात आली.
२०२४ मध्ये गुगलवर Year Ender 2024 अनेक प्रकारच्या गोष्टी शोधण्यात आल्या. ज्यामध्ये, लोकांनी 'नियर मी' या श्रेणीमध्ये सर्वात जास्त राम मंदिर शोधले आहे. गुगलच्या टॉप ट्रेंडिंगवर नियर मीच्या यादीत 'राम मंदिर माझ्या जवळ' हे सर्च तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन इतके खास होते की या दिवशी देशवासीयांनी दिवाळी साजरी केली आणि दिवे लावले. जानेवारीपासून संपूर्ण वर्षभर गुगलवर फक्त राम मंदिर शोधण्यात आले.
 
 
यावरून असे दिसून येते की, जानेवारी २०२४ मध्ये अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतरही लोक वर्षभर त्यांच्या आजूबाजूला असलेल्या राम मंदिराचा शोध घेत राहिले, जेणेकरुन त्यांच्या आजूबाजूला जे काही राम मंदिर आहे, त्यांना त्याची माहिती व्हावी आणि प्रभू रामाचे दर्शन घेता येईल.
 
 
माझ्या जवळचे Year Ender 2024 राम मंदिर शोध तिसऱ्या क्रमांकावर राहिले. प्रथम स्थानावर, लोकांनी त्यांच्या सभोवतालच्या प्रदूषणाची पातळी शोधली. माझ्या जवळील "ओणम" दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Powered By Sangraha 9.0